PM Narendra Modi : त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

कारकिर्दिवरील शंभर श्लोक कोरलेला ताम्रपट मोदींना अर्पण

261
PM Narendra Modi : त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याने त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज आणि साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी मोदींच्या यशस्वी कारकिर्दिवर शंभर श्लोक लिहिले आहेत. सदर श्लोक ताम्रपटावर कोरून त्यांनी हा पवित्र ताम्रपट आज म्हणजेच बुधवार, ९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना अर्पण केला आहे.

या ताम्रपटाला ‘मोदी शतकम’ असे नाव देण्यात आले असून ताम्रपटावर कोरलेले श्लोक पाहुन मोदी (PM Narendra Modi) काही काळासाठी भारावून गेले होते. यावेळी हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली महंतांच्या शिष्टमंडळाने मोदींकडे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशकात संस्कृत विश्वविद्यालय उभारावे, काशी विश्वनाथच्या धरतीवर त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर व्हावा तसेच भारतातील सर्व मठ आणि आखाड्यांमध्ये महिलांसाठी साध्वी भवन उभारण्यात यावे आदि आग्रही मागण्या केल्या.

(हेही वाचा – Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींचं असभ्य वर्तन; सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप)

खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आज त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे यतीशचंद्र मिश्रा,शैलेन्द्र उदावंत,पंकज मिश्रा आदि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्लीत जात पंतप्रधानांची (PM Narendra Modi) भेट घेतली.यावेळी महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज,साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या यशस्वी कारकिर्दिवर रचलेले शंभर श्लोक ताम्रपटावर कोरून ताम्रपट मोदींना अर्पण केला. महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे व यतीशचंद्र मिश्रा यांनी लॉकडाऊनच्या काळात वर्षभरात हे शंभर श्लोक रचलेले आहेत. नाशिकमधील सुजित जोशी,दिपेश देशपांडे आणि मिलिंद फडके या कलाकारांनी दिड महिना अहोरात्र काम करून श्लोक ताम्रपटावर कोरण्याचे काम केले. श्लोक कोरलेला ताम्रपट तीन फुट बाय सव्वा दोन फुट इतक्या आकाराचा आहे.

ताम्रपट अर्पण केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी सिंहस्थाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी विशेष चर्चा केली. दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा तीन वर्षांनी नाशिक येथे होणार आहे. यासाठीच्या विशेष सोयी सुविधांचे नियोजन आणि त्या संदर्भातील कामांना आतापासूनच प्रारंभ होणे गरजेचे असल्याचे हेमंत गोडसे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. काशी विश्वनाथ आणि उज्जैन महांकालेश्वरच्या धरतीवर त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर व्हावा, नाशिक येथे संस्कृत विश्वविद्यापिठ उभारण्यात यावे, तसेच भारतातील सर्वच मठ आणि आखाड्यांमध्ये महिला साध्वीसाठी स्वतंत्र साध्वी भवनाची निर्मिती करण्यात यावी,आदि आग्रही मागण्यांचे निवेदन यावेळी महंतांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना दिले. आपण केलेल्या मागण्या समर्पक भावनेतून केलेल्या असून लवकरच यावर योग्य असे सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.