Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींचं असभ्य वर्तन; सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप

103
Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींचं असभ्य वर्तन; सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप

खासदारकी मिळाल्यानंतर अनेक दिवसांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आज म्हणजेच बुधवार, ९ ऑगस्ट रोजी संसदेत (Smriti Irani) बोलत होते. राहुल गांधी बोलत असताना प्रंचड गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला. यावेळी राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी तितकेच चोख उत्तर दिले. तसेच राहुल गांधींच्या असभ्य वर्तनाची तक्रारही केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमका प्रकार काय?

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावरून सरकारवर टीका केली. तेव्हा सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांच्या टीकेला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी चोख उत्तर दिल. अशातच सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची पुण्यातून धमकी)

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘देशाच्या संसदेत यापूर्वी असं वर्तन पाहिलं नाही – स्मृती इराणी

स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवत सांगितलं की, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्या आधी बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केलं. संसदेच्या महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाइंग किस देऊ शकणारा हा केवळ दुष्ट पुरुष आहे. असं अशोभनीय वर्तन यापूर्वी कधीही देशाच्या संसदेत पाहिलं नव्हतं.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.