Central Government : जिल्हा, गाव नव्हे तर आता चक्क ‘या’ राज्याचेच नाव बदलणार

99

देशात जिल्ह्यांचे, एखाद्या गावाचे नाव बदलले जाते, पण चक्क राज्याचे नाव बदलण्याचा निर्णय क्वचित होत असतो, पण आता देशातील असे राज्य आहे, ज्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हे राज्य आहे केरळ. या राज्याचे नाव केरलम करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मांडला. तसा प्रस्तावही मंजूर झाला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, ‘नियम 118 अन्वये या सभागृहात प्रस्ताव आणला जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये आमच्या राज्याचे अधिकृत नाव बदलून ‘केरलम’ करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे.

ठराव एकमताने मंजूर

डाव्या सरकारचा हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यूडीएफ (युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) या राज्यातील विरोधी आघाडीने कोणतीही सुधारणा किंवा बदल न सुचवता तो स्वीकारला. मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या मल्याळम भाषेत याला ‘केरलम’ म्हणतात, तर इतर भाषांमध्ये केरळ म्हणतात.

(हेही वाचा Smriti Irani : भीलवाडा, स्नेहलता रेड्डी, गिरिजा टिक्कू…स्मृती इराणींनी काँग्रेसी कृत्यांचे करून दिले स्मरण; भारत मातेच्या हत्येच्या वक्तव्यावर काँग्रेसवाल्यांनी बाके वाजवली)

‘केरलीयम’ साजरे होणार

केरळमध्ये 1 नोव्हेंबरपासून ‘केरळीयम’ दिन जागतिक स्तरावर साजरा होणार आहे. याआधी मंगळवारी केरळ विधानसभेने देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या निर्णयाविरोधात एकमताने ठराव मंजूर केला होता. केरळ विधानसभा UCC लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर चिंता आणि निराशा व्यक्त करते. केंद्र सरकारच्या एकतर्फी आणि तडकाफडकी कारवाईमुळे राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य संपुष्टात येईल, असे या सभागृहाला वाटते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.