Lok Sabha Elections 2024 : आचारसंहितेआधीच कामे उरकण्याची लगबग; मंत्रालयात सर्वसामान्यांच्या रांगा वाढल्या….

1228
Lok Sabha Elections 2024 : आचारसंहितेआधीच कामे उरकण्याची लगबग; मंत्रालयात सर्वसामान्यांच्या रांगा वाढल्या....
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता याच आठवड्याच्या अखेरपर्यंत कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारी राज्यमंत्रीमंडळाच्या सलग दोन बैठका होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात प्रवेश मिळावा म्हणून मंत्रालयाबाहेर जवळपास एक ते दीड किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. आचारसंहिते आधी आपली काम वेळेत मार्गी लागावी या उद्देशाने राज्यभरातील सर्वसामान्य जनता मंत्रालयात रांगा लावून उभ्या असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. (Lok Sabha Elections 2024)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला अनेक निर्णय घ्यायचे आहेत. याशिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णयही मार्गी लावायचे आहेत. यामुळे सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता निवडणुकीपूर्वी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे या दोन दिवसांत देखील निर्णयांचा पाऊस पाडून राज्य सरकार राज्यातील जनतेला खूश करण्याचे प्रयत्न करेल, हे निश्चित मानले जाते. (Lok Sabha Elections 2024)
अभ्यागतांची गर्दी वाढली…
गेल्या काही दिवसांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आदेश काढण्यासाठीही मंत्रालयात धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यागतांची गर्दी वाढली आहे. आचारसंहिता लागू झाली तर कामे रखडतील म्हणून सर्वच जण प्रयत्नशील आहेत. (Lok Sabha Elections 2024)
मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री कार्यालयातही वर्दळ वाढली….
आपापली कामे आचारसंहितेत अडकून बसू नयेत आणि त्याचा फटका बसू नये या उद्देशाने मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री कार्यालयात वर्दळ वाढल्याचे चित्र आज मोठ्या प्रमाणात मंत्रालयात दिसून येत आहे. नेहमीपेक्षा मंत्रालयातील अभ्यागतांची संख्या दोन ते तीन पट अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. आमदारांचे विकास निधीची कामे वेळेत पास करून घेण्यासाठी मंत्री कार्यालयात आमदारांच्या पीए आणि पी एस ची धावपळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देखील आज दिसून येत आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.