Lok Sabha Election 2024 : अजित पवारांना बारामतीत दुहेरी आव्हान; विजय शिवतारे लोकसभा लढणार; तिरंगी लढतीचे संकेत

5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहेत, त्यांच्यासाठी मी पर्याय आहे. अजित पवारांच्या प्रवृत्ती विरोधात आणि सुप्रिया सुळेंनी पंधरा वर्षे काहीच काम केले नाही, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असेन, असे शिवतारे म्हणाले आहेत.

163
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी बारामतीमधून पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024)  उतरवण्याची तयारी केली आहे. पक्ष ताब्यात घेतल्यानंतर अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे त्यांचा राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणारा ठरला आहे. त्यातच ही निवडणूक शरद पवार यांच्याही प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे कालपर्यंत या ठिकाणी दुहेरी लढत होणार अशी चर्चा सुरु असतानाच आता अजित पवार यांचे जुने वैरी विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण यामुळे येथील लढत तिरंगी होणार आहे.

निवडून येण्याचा विश्वास 

सध्या पुरंदरचे आमदार असलेल्या विजय शिवतारेंनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आहेत. यासंदर्भात बोलताना चिन्ह कोणते असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे, पण मी आगामी लोकसभा लढवण्यावर (Lok Sabha Election 2024) ठाम असल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहे. 5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहेत, त्यांच्यासाठी मी पर्याय आहे. अजित पवारांच्या प्रवृत्ती विरोधात आणि सुप्रिया सुळेंनी पंधरा वर्षे काहीच काम केले नाही, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असेन, असे शिवतारे म्हणाले आहेत.

अजित पवारांनी केलेल्या अपमानाची केली आठवण 

रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचे शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटले. तसेच, अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ  (Lok Sabha Election 2024)   हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधला. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.