
-
प्रतिनिधी
DCM Eknath Shinde मुंबईच्या आकाशात गुरुवारी काळजाचा ठोका चुकवणारी एक थरारक घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला. महालक्ष्मी रेसकोर्सवरून कल्याण-मुरबाडच्या दिशेने झेपावलेले हे हेलिकॉप्टर अचानक सुसाट सुटलेल्या वादळी वाऱ्यात आणि पावसाच्या तावडीत सापडले. अवघ्या काही सेकंदांतच आनंदाचे वातावरण चिंतेत बदलले. (DCM Eknath Shinde)
(हेही वाचा – Kalyan : लोकग्राममधील भीम चौकाचे सुशोभीकरण बनले मृत्यूचा सापळा; तांत्रिक चुकीमुळे बाप-लेक गंभीर जखमी)
कल्याण परिसरात निसर्गाने अचानक रौद्र रूप धारण केल्यामुळे हवेत असलेल्या हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. दृश्यमानता शून्याच्या वर खाली झाल्याने आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर हवेतच हेलकावे खाऊ लागले. अशा मृत्यूशी गाठ पडलेल्या परिस्थितीत वैमानिकाने कमालीचे धैर्य आणि तांत्रिक कौशल्य दाखवले. संकटाची चाहूल लागताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर सुरक्षित क्षेत्राकडे वळवले आणि जुहू विमानतळावर तातडीने ‘इमर्जन्सी लँडिंग’ केले. (DCM Eknath Shinde)
(हेही वाचा – Chandrakant Patil : विद्यार्थ्यांच्या मनाचा गुंता सुटणार; अध्यापकांसाठी पुण्यात उलगडले ‘मानससूत्र’)
या थरारक प्रवासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे स्विय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रूडकर, ओएसडी राजपूत, मुख्य सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी असे एकूण आठ जण स्वार होते. सुदैवाने, वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांचा विमान दौरा रद्द करण्यात आला असून, त्यांनी रस्तेमार्गे आपला प्रवास पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. (DCM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
