Kalyan : लोकग्राममधील भीम चौकाचे सुशोभीकरण बनले मृत्यूचा सापळा; तांत्रिक चुकीमुळे बाप-लेक गंभीर जखमी

85
भीम चौकातील सुशोभीकरणामुळे अपघाताचा धोका
Kalyan : लोकग्राममधील भीम चौकाचे सुशोभीकरण बनले मृत्यूचा सापळा; तांत्रिक चुकीमुळे बाप-लेक गंभीर जखमी
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan            कल्याण पूर्वेकडे असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ४ – जे अंतर्गत येणाऱ्या लोकग्राम परिसरातील भिम चौकात करण्यात आलेले सुशोभीकरण आता नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. चौकाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या उंच आणि दृष्टीआड करणाऱ्या बांधकामामुळे या ठिकाणी सातत्याने वाहन अपघात होत असून नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी बाप-लेकावर त्यांच्यावर मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नांदिवली परिसरातील अस्ता हेरिटेजमध्ये येथील रहिवासी बिरबहादूर सहानी (५५) आणि त्यांचा मुलगा नीरज (१९) यांचा समावेश आहे. (Kalyan)

(हेही वाचा – West Bengal : बंगाल पेटवणारे रडारवर; २०० हून अधिक गुन्हे दाखल; सीसीटीव्हीच्या आधारे दंगलखोरांची धरपकड सुरू)

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी रात्री मुलुंड येथील काम आटोपून दोघे बाप-लेक कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. त्यानंतर त्यांनी लोकग्राम परिसरातील पार्किंगमधून आपली दुचाकी घेत घराच्या दिशेने प्रवास सुरू केला. भिम चौकात पोहोचताच लोकग्राम पाण्याच्या टाकीच्या दिशेने येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चौकाच्या मध्यभागी बांधण्यात आलेल्या सुमारे नऊ फूट उंचीच्या सुशोभीकरणामुळे टेम्पो चालकाला लोकग्रामच्या दिशेने येणारी दुचाकी दिसली नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनीकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सुमारे वर्षभरापूर्वी या चौकात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाबाबत स्थानिक रहिवाशांसह याच परिसरातील सुमेरू टॉवर सोसायटीने प्रशासनाला वारंवार इशारा दिला होता. चौकात असलेल्या दुभाजकावरील भिंतींची उंची अधिक असल्याने वाहनचालकांच्या दृष्टीक्षेपात येत नाही. परिणामी या चौकात भविष्यात वारंवार गंभीर अपघात होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करत संबंधित प्रभागातील चारही नगरसेवकांना लेखी निवेदन देण्यात आले होते. (Kalyan)

(हेही वाचा – Cricket Matches : महाराष्ट्र दिनानिमित्त 29व्या मलबार हिल चषक 2026 क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद)

लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष

या बांधकामाची उंची कमी करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र या तक्रारींकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या चौकात जीवघेणे अपघात घडू लागल्याने स्थानिकांमध्ये भितीसह संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेत चौकातील अडथळादायक बांधकाम हटवावे किंवा त्याची उंची कमी करावी, अशी मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या मते भिम चौक हा लोकग्राम, नांदिवली आणि परिसरातील रहिवाशांसाठी महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या चौकात दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत चौकाच्या मध्यभागी उभारण्यात आलेले उंच बांधकाम अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत. विशेष म्हणजे २ तारखेला गंभीर स्वरूपाचा अपघात घडला. तरीही अद्याप कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली नसल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.