-
प्रतिनिधी
BJP गडचिरोलीतील पूल कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आणि शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांचा दाखला देत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. (BJP)
संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर टीका करताना बन म्हणाले की, सातत्याने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. लोकशाहीची भाषा करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, जनतेनेच त्यांना त्यांच्या राजकीय भूमिकेची जाणीव करून दिली असल्याचा दावा त्यांनी केला. (BJP)
(हेही वाचा – Sheikh Hasina यांच्या पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशात खळबळ! माजी कर्णधाराच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला)
शिवसेनेच्या मूळ विचारांवर भाष्य करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचा आरोप करत, काँग्रेससोबतची युती हा त्या वैचारिक बदलाचा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेबांच्या विचारांची खरी वारसदार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. (BJP)
याचवेळी त्यांनी शिवसेना उबाठाच्या भवितव्यावरही भाष्य केले. शिवसेना उबाठा काँग्रेसमध्ये की समाजवादी पक्षात विलीन होणार, याची चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांना शिवसेना उबाठा काँग्रेसमध्ये यावी असे वाटत असल्याचा, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची समाजवादी पक्षाकडे कल असल्याचा आरोपही त्यांनी केला. (BJP)
दरम्यान, गडचिरोलीतील पूल कोसळल्याच्या घटनेवरून रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नवनाथ बन यांनी मुख्य मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पुलाच्या बांधकामाचा करार २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता आणि २०२२ मध्ये पूल पूर्ण झाला. (BJP)
त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तसेच रोहित पवार हेही महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्षाचे आमदार होते. त्यामुळे आज दलाल आणि कंत्राटदारांचे सरकार असल्याचा आरोप करणाऱ्या रोहित पवार यांनी त्या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारावी आणि त्या काळातील निर्णयांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा थेट सवाल नवनाथ बन यांनी केला. तसेच, “त्या पुलाच्या बांधकामात उद्धव ठाकरे यांनी किती टक्केवारी घेतली, याचे उत्तर द्यावे,” असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

