Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्मावरून बीसीसीआय, निवड समितीत नेमका काय विसंवाद होता? आगरकर यांची बीसीसीआयकडून फसगत झाल्याची भावना

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्मावरून बीसीसीआय, निवड समितीत नेमका काय विसंवाद होता? आगरकर यांची बीसीसीआयकडून फसगत झाल्याची भावना

107
Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्मावरून बीसीसीआय, निवड समितीत नेमका काय विसंवाद होता? आगरकर यांची बीसीसीआयकडून फसगत झाल्याची भावना
Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्मावरून बीसीसीआय, निवड समितीत नेमका काय विसंवाद होता? आगरकर यांची बीसीसीआयकडून फसगत झाल्याची भावना
  • ऋजुता लुकतुके

Rohit Sharma Selection Controversy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय निवड समिती यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे. खेळाडूंची निवड, फिटनेस, कार्यभार व्यवस्थापन आणि संघबांधणी यासारख्या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची भूमिका नेहमीच एकसारखी नसल्याचं सध्या दिसतंय. खासकरून रोहित शर्माच्या एकदिवसीय संघात समावेशावरून सध्या मोठी चर्चा रंगली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा या ज्येष्ठ खेळाडूंच्या बाबतीत सुरुवातीला गंभीरच्या नेतृत्वाखाली असलेलं संघ प्रशासन, निवड समिती आणि बीसीसीआय एकाच दिशेनं विचार करत असलेलं भासत होतं. दौघांपैकी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करून आपल्या निवडीचा प्रश्न सोडवला आहे.

तर रोहितच्या निवडीवर त्याच्या फॉर्ममधील सातत्याच्या अभावामुळे अजूनही चर्चा होत होती. मात्र इंग्लंड दौऱ्यानंतर हे चित्रही पालटलं आहे. लॉर्ड्सवरील शतकानंतर रोहितचं नाणंही खणखणीत वाजलं. आणि त्यानंतर बीसीसीआयने स्वत:हून रोहितची विश्वचषकासाठीची जागा अबाधित असल्याचं म्हटलं. दुसरीकडे, निवड समितीने मात्र अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आणि बीसीसीआयने रोहितची बाजू घेतल्यामुळे समितीचे अध्यक्ष अजित आगरकर कोंडीत सापडले आहेत.

रोहितच्या संघात समावेशावर गंभीर, आगरकर आणि बीसीसीआय यांच्यात इतके दिवस एकवाक्यता होती की नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

(हेही वाचा – MSRTC : ‘रिल्स’ बनवणं आता महागात पडणार! एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाची नवी नियमावली जाहीर )

निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि BCCI मधील काही निर्णयकर्ते यांच्यातील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबाबत, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या पुनरागमनाबाबत आणि युवा खेळाडूंना संधी देण्याच्या धोरणावरून मतभेद असल्याचं आता बोललं जात आहे.

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद शमीऐवजी युवा वेगवान गोलंदाजाला संधी देण्याच्या निर्णयानंतर या चर्चांना अधिक वेग आला. तसेच काही खेळाडूंच्या फिटनेस अहवालांबाबत निवड समिती आणि वैद्यकीय विभाग यांच्यातील समन्वयावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मात्र BCCI कडून या कथित मतभेदांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मंडळाच्या सूत्रांच्या मते, निवड समिती ही BCCI ची उपसमिती असून अंतिम निर्णय प्रक्रिया संस्थात्मक पद्धतीनेच राबवली जाते.

भारतीय संघ सध्या श्रीलंका कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे या चर्चांचा संघाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी BCCI आणि संघ व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे.

मोठ्या क्रिकेट व्यवस्थापनात मतभेद असणे असामान्य नाही, परंतु ते सार्वजनिक चर्चेचा विषय बनल्यास संघातील स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे BCCI आगामी काळात या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अधिक स्पष्ट भूमिका घेते का, याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.