Imran Khan sister Aleema Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलीमा खान यांना रविवारी लाहोरमधील त्यांच्या घरातून पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अटकेमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
अलीमा खान यांना अटक का करण्यात आली?
इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाद्वारे एक निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाची मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, मोर्चाची तयारी करत असतानाच पोलिसांनी अलीमा खान यांना अटक केली आहे. २७ सप्टेंबर रोजी नियोजित असलेल्या एका मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, इम्रान खान यांना तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीविरुद्ध अलीमा खान यांनी सातत्याने आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वी यावरून त्यांनी थेटपणे आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आता पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे २०२३ पासून रावळपिंडीच्या तुरूंगात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, त्यानंतर तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवा निराधार असल्याचं स्पष्टीकरण देत अफवा फेटाळून लावल्या होत्या.
हेही पाहा –


