बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत बांगलादेश क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बांगलादेश आवामी लीगचे माजी खासदार शकीब अल हसन (Shakib Al Hasan) यांनी देखील व्हर्चुअली पद्धतीने हजेरी लावली होती. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर शकीब यांच्या जुन्या घरावर रात्रीच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. (Sheikh Hasina press conference)
(हेही वाचा : Walmik Karad ला तुरुंगात VIP ट्रिटमेंट, धनंजय देशमुखांचं पत्र; Supriya Sule यांची पोस्ट चर्चेत)
शकीब अल हसन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री ८.४५ वाजता शकीब अल हसन यांच्या केशांबोर येथील येथील जुन्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. यावेळी अज्ञातांनी घराच्या मुख्य दरवाजावर आणि खिडक्यांवर तुफान दगडफेक करत तोडफोड केली. त्यानंतर लोखंडी दरवाजाच्या वरच्या भागावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत ही आग आटोक्यात आणली. घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. या घटनेमुळे मगुरा शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Sheikh Hasina press conference)
(हेही वाचा : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादाची सुनावणी अंतिम टप्प्यात! Eknath Shinde दरे गावात, चर्चांना उधाण)
आवामी लीगने दिली माहिती
शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या वतीने या बॉम्ब हल्ल्याची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. “बांगलादेशचे प्रसिद्ध क्रिकेटपटू शकीब अल हसन यांच्या घरावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेत सहभाग घेतल्यानंतर ही घटना घडली. पत्रकार परिषदेच्या पूर्वी बीएनपी इस्लामिस्ट जमात आणि एनसीपीने माध्यमांना परिषदेचे वृत्त प्रसिद्ध न करण्याबाबत खुली धमकी दिली होती”, असे पक्षाने पोस्टमध्ये म्हटले आहे. (Sheikh Hasina press conference)
Torching residences : the cost of attending Awami League press conference
Neo fascism engulfs BangladeshA grisly petrol bomb attack took place at the residence of Bangladesh’s celebrated cricket icon Sakib Al hasan, hours after the world famous star cricketer appeared at a… pic.twitter.com/Uqmwwih3XG
— Bangladesh Awami League (@albd1971) August 5, 2026
शकीब अल हसन यांची हसीनांच्या पत्रकार परिषदेत हजेरी
या हल्ल्याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्लीत शेख हसीना यांनी व्हर्चुअल पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ही घटना घडली. “लोकशाहीच्या नावाखाली नागरिकांची सुरु असलेल्या कत्तलीचा हा पुरावाच आहे”, अशा शब्दात आवामी लीगने या हल्ल्यावर टीका केली आहे. (Sheikh Hasina press conference)
Join Our WhatsApp Community


