शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादाची सुनावणी अंतिम टप्प्यात! Eknath Shinde दरे गावात, चर्चांना उधाण

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादाची सुनावणी अंतिम टप्प्यात! Eknath Shinde दरे गावात, चर्चांना उधाण

126
Eknath Shinde
Eknath Shinde

 

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीनंतर राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. आज या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अचानक साताऱ्यातील आपल्या मूळ ‘दरे’ या गावी दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे आणि दोन दिवसांच्या मुक्कामामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा : Walmik Karad ला तुरुंगात VIP ट्रिटमेंट, धनंजय देशमुखांचं पत्र; Supriya Sule यांची पोस्ट चर्चेत)

पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पक्षसंघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा दौरा आयोजित केला आहे. दरे येथील दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान ते सातारा व परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन स्थानिक राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यादरम्यान सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे समजते.

(हेही वाचा : Fatty Liver Disease : फॅटी लिव्हरची ही ७ लक्षणे घरच्या घरी ओळखा; आयुष्याचा महत्त्वाचा इशारा)

शिवसेना पक्षचिन्हावर आज पुन्हा सुनावणी

दुसरीकडे, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे. पक्षचिन्ह हे मूळ राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे? असा महत्त्वाचा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर शिंदेंनी साताऱ्यातील दरे गाव गाठल्याने विविध राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.