ऑस्ट्रेलियन गोलंदाज Michael Neser दुखापतीमुळे बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार

72
ऑस्ट्रेलियन गोलंदाज Michael Neser दुखापतीमुळे बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार
ऑस्ट्रेलियन गोलंदाज Michael Neser दुखापतीमुळे बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार

ब्रिस्बेनमध्ये राष्ट्रीय संघासोबत सराव करत असताना उजव्या पायाच्या पोटरीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मायकल नेसर (Michael Neser) काही काळासाठी खेळापासून दूर झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नेसर ‘स्टँड-बाय’ गोलंदाज म्हणून निवडला गेला होता, पम ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या म्हणण्यानुसार, या दुखापतीमुळे त्याला पुढील काही आठवडे सराव किंवा खेळ करता येणार नाही. आता तो सप्टेंबरच्या उत्तरार्धात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवेल.

दरम्यान, जोश इंग्लिसबाबत (Josh Inglis) ऑस्ट्रेलियाला दिलासादायक बातमी मिळाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘ॲलन बॉर्डर फील्ड’वर झालेल्या सामन्यादरम्यान त्याला पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाला होता. मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी सांगितले की, डार्विन येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी या यष्टिरक्षक-फलंदाजाच्या उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता नाही.

(हेही वाचा – AIR INDIA: टेवोल्डे ग्रेबेमारियम एअर इंडियाचे नवे सीईओ, महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबाबत म्हणाले…)

“त्याला पाठीचा त्रास जाणवला आहे. त्याला अधूनमधून असा त्रास होत असतो. यात काही अडचण नाही; फक्त ती समस्या निवळू देणे आणि त्यानंतर त्याला पुन्हा सरावात सहभागी करून घेणे एवढेच करायचे आहे,” असे मॅकडोनाल्ड म्हणाले. “आमच्याकडे पुरेसा वेळ आहे. आम्ही याबाबतीत सावधगिरी बाळगू आणि तो पुन्हा नेट्समध्ये किंवा तयारीच्या टप्प्यात परतण्यापूर्वी त्याची स्थिती पूर्णपणे ठीक असल्याची खात्री करू… तो उपलब्ध असेल की नाही, याबद्दल कोणतीही चिंता नाही.”

मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, गेल्या महिनाभरात ऑस्ट्रेलियाच्या तयारीचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करण्यात आले आहे. खेळाडू ब्रिस्बेन आणि आपापल्या राज्यांमध्ये ये-जा करत होते आणि या आठवड्यात सामन्यासारख्या सरावासाठी एकत्र आले आहेत.

“आम्ही दोन चांगले सराव सत्रे पार पाडली आहेत, ज्यात दिवसाला ६० षटके खेळली गेली आणि प्रत्येक खेळाडूने आवश्यक ती कामगिरी केली आहे,” असे ते म्हणाले. “आम्ही सरावातून एक ताळमेळ साधू शकलो आणि ‘मॅच सिम्युलेशन’द्वारे खेळाची तीव्रता वाढवू शकलो; हे सत्र जवळजवळ एका पूर्ण सामन्यासारखेच झाले, जे खूप चांगले होते.”

बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १३ ऑगस्ट रोजी डार्विन येथे सुरू होईल. दुसरी कसोटी २२ ऑगस्टपासून मॅके येथे खेळवली जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.