AIR INDIA: टेवोल्डे ग्रेबेमारियम एअर इंडियाचे नवे सीईओ, महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबाबत म्हणाले…

89
AIR INDIA: टेवोल्डे ग्रेबेमारियम एअर इंडियाचे नवे सीईओ, महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबाबत म्हणाले...
AIR INDIA: टेवोल्डे ग्रेबेमारियम एअर इंडियाचे नवे सीईओ, महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबाबत म्हणाले...

AIR INDIA: एअर इंडियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने टेवोल्डे गेब्रेमारियम यांची एअरलाइनच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी नियुक्ती जाहीर केली आहे. ते कॅम्पबेल विल्सन यांची जागा घेतील. एव्हिएशन इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अधिकाऱ्यांमध्ये टेवोल्डे गेब्रेमारियम यांची गणना होते.

इथिओपियन एअरलाइन्स ग्रुपचे सीईओ म्हणून आपल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळात त्यांनी अनेक अब्ज डॉलरच्या विस्ताराचे नेतृत्व केले आहे. ‘एअर इंडियाच्या इतिहासाच्या अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर त्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे,’ असे टेवोल्डे गेब्रेमारियम यांनी म्हटले आहे. एअर इंडियाचा वारसा उत्तम असून, भारताची आर्थिक ताकद दर्शवणारी ग्लोबल एअरलाइन बनवणे ही अत्यंत रोमांचक संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.