Bharat Jodo Nyay Yatra: सभा काँग्रेसची, गर्दी शिवसेनेची !

1251
Bharat Jodo Nyay Yatra: सभा काँग्रेसची, गर्दी शिवसेनेची !

>> विशेष प्रतिनिधी, मुंबई

राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या जाहीर सभेसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून मोठी मदत केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रे यांच्या विशाल सभा झालेल्या आहेत. या गर्दीचा उच्चांक मोडला जाईल ,अशी राहुलबाबा यांची सभा व्हावी आणि शिवाजी पार्क मैदान खचाखच भरले जावे. यासाठी उबाठा शिवसैनिक कामाला लागले आहेत. यासाठी या पक्षाच्या वतीने शाखा-शाखांमधून उबाठा शिवसैनिक शिवाजी पार्कला पाठवले जात आहेत. काँग्रेसच्या सभेचं आवताण आता शिवसैनिकांना मिळू लागल्याने एरव्ही शिवतीर्थावर बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजेरी लावणाऱ्या शिवसैनिकांना काँग्रेसची आणि पर्यायाने राहुल गांधींची सभा यशस्वी करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये गर्दी करण्याची वेळ आली आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

bharat jodo nyay yatra

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेसाठी दुपारपासून कार्यकर्ते मैदानाच्या दिशेने जमू लागले आहेत. ही जाहीर सभा संपूर्णपणे काँग्रेसची असतानाही या सभेचा गर्दीचा उच्चांक मोडण्यासाठी शिवसैनिकांचा मोठा हातभार लागणार आहे. काँग्रेसची ही सभा विशाल करण्यासाठी उबाठा शिवसेनेने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विभाग प्रमुखांच्या माध्यमातून शाखा-शाखांना निरोप पाठवून जास्तीत जास्त शिवसैनिक आणि गर्दी कशा प्रकारे जमा होईल याची काळजी घेतल्याची माहिती मिळत आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

bharat jodo nyay yatra 2

(हेही वाचा – Electoral Bonds : निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँड्सचा नवीन तपशील जाहीर )

विधानसभा व महापालिका निवडणुकीकरिता काँग्रेससोबत आघाडी
शिवसैनिकांना देण्यात आलेल्या निरोपामध्ये काँग्रेस पक्ष हा आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असून इंडि आघाडीतील आपलाही पक्ष असल्याने आघाडी धर्म बाळगून आपल्याला काँग्रेसची ही सभा अतिविशाल गर्दीची तसेच ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी असेल अशा प्रकारे ही सभा व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही महत्त्वाची असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा होणे आवश्यक आहे. शिवसेनेची आगामी लोकसभा निवडणूक आणि पुढील विधानसभा व महापालिका निवडणुकीकरिता काँग्रेससोबतची आघाडी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची सभा शिवसेनेने यशस्वी करून दिल्यास भविष्यात आघाडी होण्याचा मार्ग सुकर होईल. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे हातात हात घालून कशाप्रकारे काम करतात, हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर दर्शवता येईल, असेही उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळेच प्रत्येक शाखाशाखांमधून गर्दी जमा करण्यास सुरुवात झाली.

bharat jodo nyay yatra 1

गर्दी वाढवण्याकडे शिवसेना उपनेत्यांचे लक्ष
दरम्यान शिवाजी पार्क मैदानाच्या सभेच्या ठिकाणी काँग्रेसच्या झेंड्यांनी परिसर व्यापून गेला असून काँग्रेसच्या झेंड्यासह समाजवादी पक्षाचे झेंडेही लावले गेले आहेत. मात्र शिवसेना उबाठाचे झेंडे नसले, तरी आतील गर्दी ही शिवसेनेने जमवलेली असेल. यासाठी शिवसेनेचे उपनेते शिवाजी पार्क परिसरात उपस्थित राहून गर्दी वाढवण्यासाठी लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही गर्दी धारावी, गोवंडी, चेंबूर आणि मालाड आदी भागांमधील सर्वाधिक असेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.