Eknath Shinde : हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

154
Eknath Shinde : हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Eknath Shinde : हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. उबाठा गटाचे नंदुरबारचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

(हेही वाचा – Electoral Bonds : निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँड्सचा नवीन तपशील जाहीर)

‘गर्व से कहो हम हिंदू है’ हे  कोणत्या तोंडाने म्हणणार ?

ज्या शिवतीर्थावरून स्वर्गीय बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वारसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आलेली आहे. खरं तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन त्याना अभिवादन करायला हवे, कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे. त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणं, त्याना शिव्या शाप देणे हे कोणतं हिंदुत्व आहे..? आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे, हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला..? त्यामुळे आजचा दिवस हा शिवसेना (Shiv Sena) आणि शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे असे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवले त्यांच्यासोबत बसायची वेळ 

ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम दूर ठेवले त्यांच्यासोबत बसायची वेळ आली, तर मी माझं दुकान बंद करेन, असं मत व्यक्त केलं होतं. तेच आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे, हे दुर्दैव असल्याचे मत शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.