Amit Shah Kolhapur : “देश म्हणजे धर्मशाळा नाही; घुसखोरांना एक एक करुन…” अमित शाह यांचा थेट इशारा

146
Amit Shah addressing a public meeting in Kolhapur.
Amit Shah delivers a strong message on illegal immigration.

Amit Shah Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरातील जाहीर सभेत बेकायदेशीर घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. देशातील प्रत्येक घुसखोराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. भारताची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे नमूद करत, त्यांनी देशात राहण्याचा अधिकार हा केवळ भारतात जन्मलेल्या आणि कायदेशीर नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनाच असल्याचे ठामपणे सांगितले.

कोल्हापूर येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित ‘भव्य कृतज्ञता सोहळ्या’त बोलताना अमित शहा यांनी २०१४ पूर्वीच्या सरकारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काही सत्ताधाऱ्यांनी घुसखोरांच्या माध्यमातून मतपेढीचे राजकारण केले. मात्र आता देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत केंद्र सरकार कठोर भूमिका घेत आहे.

भाषणादरम्यान, अमित शहा म्हणाले की, भारत हा कोणासाठीही खुला आश्रयस्थान नाही. देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही आणि बेकायदेशीररीत्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी हा संदेश संपूर्ण देशासाठी असल्याचे सांगितले.

हेही वाचा: Bangladesh मध्ये हिंदू समाजाच्या संतापाचा उद्रेक; प्रभू श्रीरामांच्या अपमानाप्रकरणी सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाच मान्यता

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अमित शहा यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरही भूमिका मांडली. “पूर्वी आम्ही शिंदे गट म्हणत होतो, पण आता शिंदे गट असे काही राहिलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षच शिवसेना आहे,” असे शाह म्हणाले.

तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शहा यांच्या कार्याचा गौरव केला. देशातील नक्षलवादाविरोधातील मोहिमेला गती देण्यात तसेच सहकार क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे शिंदे म्हणाले.

हेही वाचा: Tuljapur : तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत मोठे बदल; काय आहेत नवीन नियम, घ्या जाणून

महालक्ष्मी मंदिर विकासकामांना गती देण्याचे आश्वासन

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याचा उल्लेख करताना शहा यांनी ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. मंदिर परिसरातील विकासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि भक्तांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर तसेच केदारनाथ-बद्रीनाथ विकास प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी गेल्या काही वर्षांत देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी मोठ्या प्रमाणात काम झाल्याचा दावा केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसराच्या विकासाची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंढरपूर कॉरिडॉरचे काम यावर्षी सुरू होणार असल्याचे सांगताना त्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.