OBC Reservation : आम्हाला ओबीसी मधून बाहेर काढण्याचा डाव : छगन भुजबळ

आम्हाला ओबीसी मधून बाहेर काढण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केला.

64
OBC Reservation : आम्हाला ओबीसी मधून बाहेर काढण्याचा डाव : छगन भुजबळ
OBC Reservation : आम्हाला ओबीसी मधून बाहेर काढण्याचा डाव : छगन भुजबळ

आम्हाला ओबीसी मधून बाहेर काढण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केला. ते बुधवारी (०८ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलत होते. (OBC Reservation)

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी छगन भुजबळ हे मुंबई उच्च न्यायलयात दाखल झाले आहेत. यावेळी भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (OBC Reservation)

भुजबळ म्हणाले, ज्यांना कायदेशीरदृष्ट्या आरक्षण देता येत नाही त्या लोकांना ओबीसीमध्ये घेतले जात आहे आणि जे आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत त्यांना मात्र ओबीसीतून बाहेर ढकलायचा डाव सुरु आहे. असा दुहेरी कार्यक्रम सरकारचा सुरु आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारवर आरोप केला. (OBC Reservation)

(हेही वाचा – Mahadev Appचा मुंबईतही परिणाम; पोलिसांकडून ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल)

बच्चू कडू यांचा भुजबळांना विरोध

शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांच्यानंतर आता सत्ताधारी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी देखील भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. मराठा कुणबी नाहीतर कोण? पाकिस्तानातून आणि अमेरिकेतून मराठा समाज आलाय का? मराठा हे कुणबीच आहेत. काही लोक मतांचा हिशोब करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. छगन भुजबळ अभ्यासू नेते आहेत. महात्मा फुले यांनी सांगितले आहे की, कुणबी, माळी, मराठा हे भाऊ भाऊ आहेत. त्यांना वेगळे करू नका. अठरा पगड जातीतले सगळे मराठे आहेत. मराठे हे समुहवाचक शब्द आहेत ते कोण्या जातीचा नाही. मराठे कुणबी आहेत, असे बच्चू कडू म्हणाले. (OBC Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.