Mahadev Appचा मुंबईतही परिणाम; पोलिसांकडून ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल

58

अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या Mahadev App च्या प्रकरणात आता मुंबईतीलही रती महारथी अडकल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी Mahadev Appच प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्यासह ३१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार, फसवणुकीच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला आहे. त्यानुसार प्रकाश बनकर यांच्या फिर्यादीवरून माटुंगा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471, 120 (ब) आणि जुगार कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांचा दावा आहे की या आरोपीने खिलाडी बेटिंगMahadev App वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी अॅपच्या साहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता.

(हेही वाचा Maharashtra Government : धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती; एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय)

कोण आहे सौरभ चंद्राकर?

सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभने त्याचा मित्र रवी उप्पलसोबत ‘महादेव ऑनलाईन अॅप’ सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.