Maharashtra Government : धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती; एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय

111

राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Government) ८ नोव्हेंबर रोजी ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत धनगर समाजाच्या विकासासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी असलेली एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.

‘हे’ निर्णय झाले मंत्रिमंडळ (Maharashtra Government) बैठकीत

  • धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तिप्रदत्त समिती.
  • राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. 4250 कोटी तरतुदीस मान्यता
  • मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.
  • अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे  राज्य निवड मंडळामार्फत भरणार
  • मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.
  • गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार
  • विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा
  • मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार
  • बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार
  • महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार
  • नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व  दंड माफ

(हेही वाचा OBC Reservation : OBC आरक्षणाच्या याचिकेच्या सुनावणीला छगन भुजबळ उपस्थित राहणार; काय आहे याचिका?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.