CM Eknath Shinde यांनी मदत केल्याने पक्षांतर केले; रवींद्र वायकर यांचा खुलासा

152
CM Eknath Shinde यांनी मदत केल्याने पक्षांतर केले; रवींद्र वायकर यांचा खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडचणीच्या काळात मदत केल्याने आपण पक्षांतर केले, अशी सारवासारव रवींद्र वायकर यांनी केली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. (CM Eknath Shinde)

आपल्याला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंत:करणानेच आपण पक्ष बदलला, अशा कबुलीनंतर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी शनिवारी सरवासारव केली. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Mihir Kotecha vs Sanjay Patil : कोटेचांचे संजय पाटील यांना खुले आव्हान, म्हणाले या समोर…)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यामागे उभे राहिले नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तत्काळ मदत केल्यानेच आपण पक्षप्रवेश केल्याचे वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्यावरील सर्व आरोप खोटे असतानाही सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आली. आपण चौकशीला सामोरे गेलो. या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्या मागे उभे राहिले नाहीत. मी प्रचंड दबावाखाली होतो. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू समजावून घेतली आणि मला पाठिंबा देत न्याय दिला. अडचणीच्या काळात ज्यांनी मला मदत केली, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, अशी भूमिका वायकर यांनी मांडली. आपल्या मुलाखतीचा विपर्यास केला, असा दावाही त्यांनी यावेळी केला. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.