ICC ODI Ranking : बाबर आझमला मागे टाकून शुभमन गिल फलंदाजांच्या यादीत अव्वल, तर सिराजचीही मोठी झेप

विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर भारतीयांना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. युवा सलामीवीर शुभमन गिल बाबर आझमला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आणखी कुणाचा किती फायदा झाला आहे पाहूया…

105
Shubman Gill on Impact Player : इम्पॅक्ट खेळाडूबद्दल गुजरातचा कर्णधार शुभमन गिल काय म्हणतो?
  • ऋजुता लुकतुके

विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर भारतीयांना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. युवा सलामीवीर शुभमन गिल बाबर आझमला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आणखी कुणाचा किती फायदा झाला आहे पाहूया… (ICC ODI Ranking)

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला विश्वचषक स्पर्धेत चांगला फॉर्म गवसला आहे आणि त्या जोरावर आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतही त्याने पाकच्या बाबर आझमला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. या विश्वचषकात पहिले दोन सामने गिल डेंग्यूने आजारी असल्यामुळे खेळ शकला नव्हता. त्यानंतर त्याची सुरुवात थोडी धिमी झाली. पण, शेवटच्या दोन सामन्यांत त्याने पुन्हा एकदा आपला जोर दाखवून दिला आहे. (ICC ODI Ranking)

कर्णधार रोहित शर्माबरोबर संघाला वेगवान सुरुवात करून देण्याची भूमिका तो निभावतोय. दुसरीकडे पाकचा बाबर आझम या विश्वचषकात थोडा चाचपडतोय. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या क्रमवारीत हा बदल अपेक्षितच होता. (ICC ODI Ranking)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीनंतर क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय ठरलाय. शुभमनने श्रीलंकेविरुद्ध तडाखेबंद ९२ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो २३ वर बाद झाला. या स्पर्धेत आतापर्यंत ६ सामन्यांत त्याने २१९ धावा केल्या आहेत. (ICC ODI Ranking)

(हेही वाचा – Namo Programme : राज्यात राबविणार ‘नमो ११ कलमी कार्यक्रम)

बाबर आझम मागची दोन वर्षं एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल होता. पण, त्याची सद्दी यावेळी शुभमनने मोडून काढली. बाबर आझमने ८ सामन्यांत २८२ धावा केल्या आहेत. पण, शुभमनपेक्षा आता त्याचे ६ रेटिंग गुण कमी आहेत. (ICC ODI Ranking)

शुभमन बरोबरच भारताचा आघाडीचा गोलंदाज महम्मद सिराजनेही गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. शुभमनच्या पाठोपाठ भारताचा विराट कोहलीही आता फलंदाजांच्या क्रमवारीत चौथा आहे. तिसऱ्या क्रमांकावरील क्विंटन डी कॉक पेक्षा त्याचा एक रेटिंग गुण कमी आहे. (ICC ODI Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.