तो प्रत्येक पालकमंत्र्यांचा अधिकारच, Aditya Thackeray यांनी दिली कबुली

114
तो प्रत्येक पालकमंत्र्यांचा अधिकारच, Aditya Thackeray यांनी दिली कबुली

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी कार्यालय स्थापल्यामुळे तसेच महापालिकेच्या कामांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह विरोधकांनी जोरदार टीका केली होती. परंतु आदित्य ठाकरे हेही ठाकरे सरकारच्या काळात उपनगराचे पालकमंत्री होते आणि त्यांनी महापालिकेच्या कामांमध्ये विशेष लक्ष घातले होते. आणि त्या काळात मुंबईचा पालकमंत्री म्हणून माझा जो अधिकार होता तो मी वापरत होतो, अशी स्पष्ट कबुलीच आदित्य ठाकरे झी २४ तासच्या एका मुलाखतीत दिली. त्यामुळे स्वत: पालकमंत्री असेल तर आपला अधिकारी आणि दुसरे पालकमंत्री असेल तर तो त्यांचा अधिकार ठरत नाही असा सवाल आता लोढा आणि केसरकर यांच्यावर केलेल्या टीकांबाबत केला जात आहे. (Aditya Thackeray)

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांची झी २४ तासने एक मातोश्री येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना तत्कालिन नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या खात्यात आपण हस्तक्षेप करत होतात, याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी, या गोष्टी जेवढ्या बोलतात, तेवढा मला आनंदच होत आहे. माझ्या मुंबईसाठी जेव्हा मी पालकमंत्री झालो होतो. तेव्हा मी कामही करत होतो. तो माझा अधिकारच होता. तसा प्रत्येक पालकमंत्र्यांचा तो अधिकारच आहे, असे ठाकरे म्हणाले. तत्कालिन नगरविकास खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना माझ्या कार्यालयातून त्यांना विजिट करण्यासाठी विनंती केली जायची. मात्र, कोस्टल रोडच्या प्रकल्प कामांमध्ये त्यांना कधीही बोलावले नाही. कारण कोस्टल रोडशी त्यांचा काही संबंध नाही. तो काही प्रकल्प राजकीय नव्हता. कोस्टल रोड प्रकल्प मी आणि उद्धव ठाकरे स्वत: बघत होते. कारण ते महापालिकेचे काम होते. महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. म्हणून आमचा या प्रकल्पावर लक्ष होते. (Aditya Thackeray)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उमेदवारांसाठी रात्र थोडी, सोंगे फार)

विशेष म्हणजे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईत महापालिकेत प्रशासक नियुक्त असल्याने शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मुख्यालयात कार्यालय प्राप्त केले. पालकमंत्र्यांसाठी कार्यालय दिल्याने जोरदार टीका केली होती. पालकमंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केवळ नगरसेवक महापालिकेत नसल्याने लोकांना त्यांच्या समस्या मांडता याव्यात म्हणून कार्यालय थाटली, त्यावर आदित्य ठाकरे हे टीका करताना पालकमंत्र्यांच्या अधिकाराला विसरले, पण आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या मुखातून आपण पालकमंत्री होतो, तेव्हा मी आपल्या अधिकाराचा वापर करूनच महापालिकेत काम करत होतो, हे कबुल केले. (Aditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.