Lok Sabha Election 2024 : उमेदवारांसाठी रात्र थोडी, सोंगे फार

90
Lok Sabha Election 2024 : उमेदवारांसाठी रात्र थोडी, सोंगे फार

लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील प्रचार टिपेला पोहोचला असून या निवडणुकीचा प्रचार करताना काही उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. अनेक उमेदवारांच्या नावाची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच झाल्याने त्यांना प्रचारासाठी दिवसच कमी मिळत आहे. त्यामुळे रॅलीद्वारे प्रचार करणे शक्य होत नसल्याने त्यांना धावत पळतच प्रचार आटोपता घ्यावा लागत आहे, त्यामुळे अनेक जण वाड्या वस्त्या आणि इमारती, नगरमध्ये जावून मेळाव्याद्वारे सभा घेऊन आपली आणि आपल्या निशाणीची ओळख करून देत आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना रात्र थोडी, सोंगे फार या म्हणीप्रमाणे झाल्याचे दिसून येत आहे. (Lok Sabha Election 2024)

मुंबईमधील दक्षिण मुंबई शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई, उत्तर पश्चिम मतदार संघात अमोल किर्तीकर आणि शिवसेनेच्यावतीने दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे, तसेच भाजपाच्यावतीने उत्तर मुंबईत पीयूष गोयल आणि ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने त्यांच्या प्रचाराची दुसरी फेरीही संपत आली आहे. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आल्याने त्यांनी मतदार संघात बांधणी करण्यास सुरुवात केली होती, तर याच मतदार संघात शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार असल्याने त्यांनी आधीपासूनच फिरण्यास सुरुवात केली होती आणि उमेदवारी जाहीर होताच ते अधिक फिरु लागले. (Lok Sabha Election 2024)

New Project 2024 05 10T194959.008

(हेही वाचा – विचारपूर्वक बोला; Mallikarjun Kharge यांना निवडणूक आयोगाने फटकारले)

उतर मुंबईत भाजपाचे पीयूष गोयल यांची उमेदवारी आधीच घोषित झाल्याने त्यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण झाली आहे, आणि दुसरी फेरीही शेवटच्या टप्प्यात आली आहे, तर ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना उबाठाचे संजय पाटील यांचीही प्रचाराची फेरी फेरी पूर्ण झाली आहे. तर उत्तर पश्चिममधील शिवसेनेचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव, उत्तर मध्य मुंबईतील भाजपाचे उज्ज्वल निकम, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, उत्तर मुंबईतील भुषण पाटील यांची उमेदवारी उशिराने झाल्याने त्यांना प्रचारासाठी फारच कमी दिवस मिळत आहे. (Lok Sabha Election 2024)

त्यामुळे कार्यकर्ते, घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळावे, दिवसाच्या प्रचार रॅली, सभा, गाठी भेटी यासाठी वेळच कमी पडत असून उमेदवारांना प्रत्येकांचा मान राखण्यासाठी धावता प्रवास करावा लागत आहे. त्यातच अनेक प्रसारमाध्यमांना तसेच अनेक मंचावर जावून मुलाखती द्यावे लागत असल्याने त्यासाठीही वेळात वेळ काढावा लागत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बैठका, गुप्त भेटी केल्यानंतर सकाळी पुन्हा प्रचार रॅलीला तयार होताना प्रत्येक उमेदवाराला तारेवरील कसरत करावी लागत आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.