Asaduddin Owaisi : छोटा भाऊ तोफ आहे; खासदार ओवैसींची हिंदूंना उघड धमकी

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, त्यांनी 15 सेकंद किंवा 1 तास घेतला पाहिजे. मी काय कोंबडीचे पिल्लू आहे का 15 सेकंदांत संपवायला ? मी कुठे येऊ तुम्ही तुमच्या दिल्लीतल्या बापाला विचारून सांगा.

172
Asaduddin Owaisi : छोटा भाऊ तोफ आहे; खासदार ओवैसींची हिंदूंना उघड धमकी
Asaduddin Owaisi : छोटा भाऊ तोफ आहे; खासदार ओवैसींची हिंदूंना उघड धमकी

माझा छोटा भाऊ तोफ आहे. मी त्याला थांबवले आहे. ज्या दिवशी मी त्याला सांगेन; मी आराम करतो, तू सांभाळ, तेव्हा तुम्ही पहा काय होते. तो छोटा नाही. तो कोण आहे, ते तुम्हाला माहिती आहे का ? तो सालारचा मुलगा आहे. तो कोणाच्या बापाला ऐकत नाही, अशी उघड धमकी एमआयएमचे (MIM) खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी दिली आहे. भाजपा नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते.

(हेही वाचा – Uddhav Thackeray वोट जिहादचे आका; ॲड. Ashish Shelar यांचा घणाघात)

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा ?

अकबरूद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी यापूर्वीच हिंदूंना धमकी दिली होती. १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू, अशी धमकी अकबर ओवैसी यांनी दिली होती. त्याचा संदर्भ देऊन नवनीत राणा यांनी म्हटले होते की, आम्हाला 15 सेकंद मिळाले, तर या दोन लहान आणि मोठ्या भावांना ते कुठून आले आणि कुठे जायचे, हे समजू शकणार नाही.”

मी कुठे येऊ ?

नवनीत राणांच्या या विधानावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, त्यांनी 15 सेकंद किंवा 1 तास घेतला पाहिजे. मी काय कोंबडीचे पिल्लू आहे का 15 सेकंदांत संपवायला ? मी कुठे येऊ तुम्ही तुमच्या दिल्लीतल्या बापाला विचारून सांगा. तुमच्या घरी येऊ कि तुमच्या ऑफिसमध्ये येऊ ?, अशी उघड चिथावणी ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.