Mumbai South LS constituency : मुंबई-उपनगरातील वयस्कर मतदार सर्वाधिक दक्षिण मुंबईत

मुंबईमध्ये वयस्कर म्हणजे ८० च्या सर्वाधिक पुढील मतदार मुंबईच्या टोकाला, दक्षिण मुंबईत वसलेले आहेत.

100
Mumbai South LS constituency : मुंबई-उपनगरातील वयस्कर मतदार सर्वाधिक दक्षिण मुंबईत

मुंबईमध्ये वयस्कर म्हणजे ८० च्या सर्वाधिक पुढील मतदार मुंबईच्या टोकाला, दक्षिण मुंबईत वसलेले आहेत. मुंबईतील मतदारांची आकडेवारी निवडणूक कार्यालयाने आज शुक्रावारी ९ मे ला जाहीर केली. या आकडेवारीनुसार दक्षिण मुंबई मतदार संघात तब्बल ७२,३४७ मतदार हे ८० पेक्षा जास्त वयाचे आहेत. (Mumbai South LS constituency)

पहिल्यांदा मतदान करणारे

दक्षिण मुंबईमध्ये एकूण मतदारांची संख्या १५.३६ लाख असून त्यात ७२,३४७ म्हणजे जवळपास ४.५ टककयापेक्षा थोडे अधिक वयस्कर आहेत तर पहिल्यांदा मतदान करणारे १८-१९ वयोगटातल्या तरुण मतदारांची संख्या १५,८७६ आहे, म्हणजे केवळ एक ते सव्वा टक्का. (Mumbai South LS constituency)

(हेही वाचा – विचारपूर्वक बोला; Mallikarjun Kharge यांना निवडणूक आयोगाने फटकारले)

दोन अरविंद सावंत

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या यामिनी जाधव तर शिवसेना उबाठाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, या मतदार संघात आणखी एक अरविंद सावंत नावाचे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Mumbai South LS constituency)

या मतदार संघातील एकूण १५.३६ लाख मंतदारांपैकी ८.३२ लाख पुरुष असून ७.३ लाख महिला मतदार आहेत तर शेवटच्या टप्प्यात २० मे ला या मतदार संघात मतदान होणार आहे. (Mumbai South LS constituency)

राज्यात सर्वाधिक वयस्कर मतदार बारामतीत

मुंबईतील सर्वाधिक वयस्कर दक्षिण मुंबईत असून राज्यातील सर्वाधिक वयस्कर (८० प्लस) मतदारांची संख्या बारामती लोकसभा मतदार संघात ७४,४६४ आहे तर त्या खालोखाल धाराशीव ७४,०८७ आहे. पण बारामतीत एकूण मतदारांची संख्या ही २३.६६ लाख असून धाराशीवची मतदार संख्या १९.९१ लाख इतकी आहे. (Mumbai South LS constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.