Health Tips : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, आहारात करा ‘या’ ५ भाज्यांचा समावेश

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट नियमित खाणे हा सोपा मार्ग आहे

20
Health Tips : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, आहारात करा 'या' ५ भाज्यांचा समावेश
Health Tips : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, आहारात करा 'या' ५ भाज्यांचा समावेश

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास अशक्तपणा जाणवतो. (Health Tips)  शरीरातील हिमोग्लोबीन कमी असेल, तर थकवा, अशक्तपणा, श्वास घ्यायला त्रास होणे अशा समस्या जाणवतात. काही वेळा डोकेदुखीही सुरू होते. शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असेल, तर आहारात काही भाज्यांचा समावेश केल्यास, रक्ताची कमतरता भरून निघू शकते. या भाज्या म्हणजे सर्वोत्तम आयर्न टॉनिक आहेत. यांच्या सेवनाने अशक्तपणावर मात करता येऊ शकते. जाणून घेऊया, या भाज्यांचा आहारातील समावेश आणि त्यांच्या उपयुक्ततेविषयी !

पालक
रक्ताची कमतरता असलेल्यांनी आहारात पालकाचा समावेश करावा. रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमिया या आजारावर पालक फायदेशीर आहे. पालकामध्ये जीवनसत्त्व सी आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

बीटरूट
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट नियमित खाणे हा सोपा मार्ग आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असते, पण त्यात पोटॅशियम आणि फायबर तसेच फॉलिक अॅसिडदेखील असते. बिटाचा ज्यूस, सूप, कोशिंबिर, भाजी, सलाड किंवा बिटाच्या पानांची भाजी …अशा प्रकारे आहारात बिटाचा समावेश केल्यास हिमोग्लोबिन लवकर वाढायला मदत होते.

दुधी भोपळा
रक्ताची कमतरता असलेल्यांसाठी दुधी भोपळा हा उत्तम पर्याय आहे. दुधी भोपळ्याच्या रसात रक्त वाढवण्याची ताकद असते, कारण यामध्ये लोह आणि पोटॅशियम असते.

(हेही वाचा – The India Club : ब्रिटनमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जपणारे ‘इंडिया क्लब’ हे उपहारगृह होणार बंद )

रताळे
हिवाळ्याच्या दिवसांत रताळे कंदमूळ बाजारात विक्रीसाठी सहज उपलब्ध होते. रताळ्याच्या प्रत्येक अर्धा कप सर्व्हिंगमध्ये २.५ मिलिीग्रॅम लोह असते. यामध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते. रताळे उकडून किंवा अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये मिसळून, रताळ्याचा किस, भाजी इत्यादी पदार्थांमध्ये वापरून खाता येईल.

कोलार्ड ग्रीन
कोलार्ड ग्रीनमध्ये जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानले जाते. ही भाजी जीवनसत्त्वे, लोह, जीवनसत्त्व बी-6 आणि मॅग्नेशियमने परिपूर्ण आहे. एक कप वाफवलेल्या कोलार्ड ग्रीन भाजीमध्ये ५० मिलीग्रॅम लोह असते. त्यामुळे आहारात या भाजीचा समावेश केल्यास रक्तवाढीसाठी उत्तम गुणकारी ठरू शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.