The India Club : ब्रिटनमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जपणारे ‘इंडिया क्लब’ हे उपहारगृह होणार बंद

120
The India Club : ब्रिटनमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जपणारे ‘इंडिया क्लब’ हे उपहारगृह होणार बंद
The India Club : ब्रिटनमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जपणारे ‘इंडिया क्लब’ हे उपहारगृह होणार बंद

‘इंडिया क्लब’ हे ब्रिटनमधील सुरुवातीच्या भारतीय उपाहारगृहांपैकी एक असलेले उपहारगृह १७ सप्टेंबरपासून बंद होत आहे. (The India Club) हा क्लब भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित आहे. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे, राष्ट्रवादी नेत्यांचे भारताच्या पारतंत्र्यांच्या काळातील हे एक महत्त्वाचे केंद्र होते. माजी भारतीय पंतप्रधानांसह प्रभावी भारतीय नेत्यांच्या छायाचित्रांनी त्यांच्या भिंती सुशोभित होत्या. या क्लबचे संस्थापक सदस्य कृष्ण मेनन होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटनमधील पहिले भारतीय उच्चायुक्तपद भूषवले.

(हेही वाचा – Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसानिमित्त राजकारण्यांवर टीकेची झोड, राज ठाकरेंनी ट्विटरवर व्यक्त केली प्रतिक्रिया)

पारशी वंशाचे यादगर मार्कर हे त्यांची पत्नी फ्रॅनी आणि मुलगी फिरोजा यांच्यासह ही संस्था चालवतात. हा क्लब त्यांनी १९९७ मध्ये घेतला. त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. या कुटुंबाने ‘सेव्ह इंडिया क्लब’ मोहीम सुरू राबवली होती. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांना घरमालकांनी अत्याधुनिक हॉटेलसाठी रस्ता बनवण्याची नोटीस बजावली, तेव्हा ही इमारत अर्धवट पडण्यापासून वाचवण्यासाठी प्राथमिक न्यायालयीन लढाई जिंकली होती. मध्यवर्ती लंडनमध्ये असलेल्या या क्लबमध्ये येणारे लोक येथे गरमागरम डोसे आणि पकोडय़ांचा आस्वाद घेत असत.भारतीय स्वातंत्र्यानंतर ते ब्रिटिश दक्षिण आशियाई समुदायाचे केंद्र बनले. क्लब व्यवस्थापक फिरोजा मार्कर यांनी सांगितले की, आम्ही १७ सप्टेंबरपासून क्लब बंद करत आहोत. हे समजल्यापासून येथे मोठी गर्दी जमत आहे. आम्ही क्लब बंद करत असलो, तरी हा क्लब स्थलांतरित करण्यासाठी नवीन परिसर शोधत आहेत. (The India Club)

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतियांसाठी घरासारखी जागा म्हणजे ‘इंडिया क्लब’ ! – श्रावणी बसू, ब्रिटिश भारतीय इतिहासकार आणि पत्रकार

ही वास्तू आमच्यासाठी प्रेरणादायी होती. येथील पदार्थांची आम्हाला सदैव आठवण येत राहील. ‘इंडिया क्लब’च्या इतर संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या पत्रकार चंद्रन थरूर यांची लंडनस्थित कन्या स्मिता थरूर आपले बंधू काँग्रेस खासदार शशी थरूर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांसह नियमितपणे क्लबमध्ये येत असत. त्यांनी सांगितले की, ‘इंडिया लीग’च्या अनेक माजी नेत्यांनी आणि संस्थापकांनी ‘इंडिया क्लब’ची स्थापना केली होती. लंडनमध्ये राहणाऱ्या भारतियांसाठी घरापासून दूर घरासारखी जागा उपलब्ध करून देणे हा त्यामागील हेतू होता. जेव्हा आम्ही भारतात मोठे होत होतो, तेव्हा माझे वडील आम्हाला याबद्दलच्या गोष्टी सांगायचे. माझ्यासाठी हा क्लब बंद होणे खूप भावनिक आणि दु:खद आहे. कारण तो माझ्या वडिलांच्या स्मृतींशी निगडित होता. त्यांची आठवण झाली, की मी इथे यायचे. (The India Club)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.