Asia Cup 2023 Final : आशिया कपकडे प्रेक्षकांची पाठ; अंतिम सामन्यासाठी केवळ १०% प्रेक्षक उपस्थित राहणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) श्रीलंकेत तिकिटांच्या दरात वाढ केली.

82
Asia Cup 2023 Final : आशिया कपकडे प्रेक्षकांची पाठ; अंतिम सामन्यासाठी केवळ १०% प्रेक्षक उपस्थित राहणार

आज म्हणजेच रविवार १७ सप्टेंबर रोजी भारतीय संघ आठव्यांदा (Asia Cup 2023 Final) आशिया चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना श्रीलंका आणि भारत या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आतापर्यंत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका सात वेळा लढले आहेत. यापैकी ७ अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं तीन वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे, यावर्षी कोण सरस ठरणार हे पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत.

अशातच क्रिकेट चाहत्यांनी मात्र प्रत्यक्ष मैदानावर (Asia Cup 2023 Final) जाऊन सामना पाहण्याचे टाळले आहे. अंतिम सामनावेळी प्रेमदासा स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले जाईल, अशी आशा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली होती. मात्र अंतिम सामन्यासाठी केवळ १०% प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेचे क्रीडा पत्रकार मुआद राजिक म्हणतात की, स्टेडियममध्ये चाहते कमी येण्याचे कारण म्हणजे तिकीटाचे वाढलेले दर. ते म्हणतात की श्रीलंकेत सहसा सर्वात स्वस्त तिकीट ६५ रुपयांना मिळते, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) श्रीलंकेत तिकिटांच्या दरात वाढ केली.

(हेही वाचा – Asia Cup 2023 Final : आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज)

हे चषक आधी युएई येथे भरवण्याचा विचार होता. त्यानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Asia Cup 2023 Final) या सामन्यांच्या तिकिटाचे दर निश्चित केले होते. मात्र हा आशिया चषक नंतर श्रीलंकेत भरवला गेला असला तरीही याचे प्रमुख यजमान पद हे पाकिस्तानकडेच असल्याने त्यांनी युएईप्रमाणे श्रीलंकेमधील तिकिटांचे दर निश्चित केले. या चषकातील सुपर-4 सामन्यातील सर्वात स्वस्त तिकीटही १५४५ रुपयांना उपलब्ध होते. त्यामुळे प्रेक्षकांनी मैदानात जाऊन प्रत्यक्ष सामना पाहण्याकडे पाठ फिरवली.

या सर्व पार्श्वभूमीवर आता पीसीबीने फायनलच्या (Asia Cup 2023 Final) तिकीट दरात कपात केली आहे. राजिक यांनी सांगितल्यानुसार, श्रीलंकेच्या सामन्याला फक्त ४-५ हजार चाहते आले होते, तर स्टेडियमची क्षमता ३५ हजार होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.