Health Tips : अति गरम पदार्थ खाताना जीभ भाजली; तात्काळ आरामासाठी ‘हे’ करा घरगुती उपचार

19
Health Tips : अति गरम पदार्थ खाताना जीभ भाजली; तात्काळ आरामासाठी 'हे' करा घरगुती उपचार
Health Tips : अति गरम पदार्थ खाताना जीभ भाजली; तात्काळ आरामासाठी 'हे' करा घरगुती उपचार

घाईघाईने गरम पदार्थ खाल्ला जातो, अशावेळी जिभेला चटका बसण्याची शक्यता असते. धावपळ किंवा गडबडीच्या वेळी गरमगरम चहा, कॉफी, एखादा गरम पदार्थ खाताना, पिताना चटका लागला की, जीभ चुरचुरते. जिभेला चटका लागला की, त्यानंतर कोणताही पदार्थ खाताना त्रास होतो.

जीभ भाजली की, आपण लगेच थंड पाणी पितो, पण तरीही जीभ चुरचुरत असेल तर इतरही काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया –

थंड पाणी पिणे
जीभ भाजल्यानंतर सर्वप्रथम थंड पाणी प्यावं अथवा फ्रिजमध्ये असलेलं एखादं थंड पेय प्यावं. थंड पाणी अथवा थंड पेय प्यायल्याने भाजलेल्या जिभेपासून थोडा आराम मिळेल. थंड पेय प्यायल्याने जीभेची सतत जळजळ जाणवणार नाही.

दही किंवा दूध पिणे
दही खाल्ल्याने किंवा दूध प्यायल्याने देखील भाजलेल्या जिभेपासून लवकर आराम मिळतो. दही आणि दुधात असलेले प्रोबायोटिक्स जिभेला आराम देण्यास फायदेशीर ठरतात.

(हेही वाचा – Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसानिमित्त राजकारण्यांवर टीकेची झोड, राज ठाकरेंनी ट्विटरवर व्यक्त केली प्रतिक्रिया )

तूप
जीभ भाजल्यानंतर जिभेवर थोडं तूप लावल्याने जिभेची जळजळ कमी होते. तुपात असलेले फॅट्स जिभेची त्वचा मऊ करतात आणि जिभेची जळजळ कमी करतात. याशिवाय तुपात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जिभेच्या भाजलेल्या भागाला अजून वाढण्यापासून रोखतात आणि जीभ लवकर बरी करतात.

लिंबाचा रस
जीभ भाजते तेव्हा त्यावर लिंबाचा रस लावल्याने फायदा होतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म असतात, जे जिभेची भाजलेली त्वचा बरी करण्यास मदत करतात.

साखर किंवा मधाचा वापर
मधामध्ये रोगाणुविरोधी गुणधर्म अधिक प्रमाणात असतात. जीभ पोळल्यानंतर लगेच मध लावल्याने जिभेला पटकन थंडावा मिळतो आणि जिभेची जळजळ होत नाही. याशिवाय साखर आणि मध एकत्र करून लावल्याने देखील जीभेला त्वरीत आराम मिळतो.

मिठाच्या पाण्याने गुळण्या
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने जिभेवरील सूज कमी होते आणि जळजळणाऱ्या जिभेमुळे होत असणारा त्रास देखील कमी होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.