Jammu-Kashmirच्या राजौरी जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट, लष्कराचे ४ जवान जखमी

59
Jammu-Kashmirच्या राजौरी जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट, लष्कराचे ४ जवान जखमी
Jammu-Kashmirच्या राजौरी जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट, लष्कराचे ४ जवान जखमी

Jammu-Kashmir जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भूसुरुंग स्फोटात कनिष्ठ अधिकाऱ्यांसह लष्कराचे चार जवान जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नौशेरा सेक्टरमधील कलाल या समोरील भागात लष्कराच्या जवानांकडून गस्त सुरू असताना एका भूसुरुंगचा अपघाती स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – Dombivli : स्वरांनी फुलला सामाजिक यज्ञ; आरोहीच्या मैफिलीत आशा भोसलेंच्या २८ गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध

या स्फोटात एक जेसीओ आणि तीन सैनिक जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. घुसखोरी विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून समोरील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग पेरलेले असतात. काही वेळा पावसामुळे भूसुरुंग वाहून येतात आणि त्यामुळे अशा अपघाती घटना घडतात, अशी माहिती त्यांनी दिली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.