Dombivli : स्वरांनी फुलला सामाजिक यज्ञ; आरोहीच्या मैफिलीत आशा भोसलेंच्या २८ गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध

122
संगीत मैफिलीत गायक गात आहेत.
Dombivli : स्वरांनी फुलला सामाजिक यज्ञ; आरोहीच्या मैफिलीत आशा भोसलेंच्या २८ गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli           स्वरांनी समाजसेवा घडविण्याचा अनोखा प्रयोग डोंबिवलीत पहायला मिळाला. दंत चिकित्सक डॉ. मंदार अंजर्लेकर व डॉ. श्वेता अंजर्लेकर यांनी स्थापन केलेल्या आरोही फाऊंडेशनतर्फे सलोना सा सजन है… और मैं हूँ ! या शीर्षकाखाली स्वर्गीय आशा भोसले यांच्या गीतांची सुरेल मैफल डोंबिवलीच्या शुभमंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी सादर करण्यात आली. गेली कित्येक वर्षे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अंजर्लेकर डॉक्टर दाम्पत्याचा हा उपक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Dombivli)

(हेही वाचा – PM Modi Slovakia Visit : मोदींच्या स्लोव्हाकिया दौऱ्यात 11 महत्त्वाचे करार; भारतासाठी काय लाभ?)

या कार्यक्रमात डॉ. मंदार, शिल्पा, कश्मिरा, शांतनू, राहूल, निखिल, ईशा आणि अयान या नावाजलेल्या गायकांनी आशा भोसले यांनी गायलेल्या २८ निवडक हिंदी-मराठी गीतांचा स्वरपुष्प रसिकांसमोर उधळला. सपना मेरा टूट गया… राधा कैसे ना जले… कभी तो नजर मिलाओ… चंद्र आहे साक्षीला… आला आला वारा… गोमू संगतीनं माझ्या तू येशील का… यांसारख्या गाण्यांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. वाद्य वादकांच्या साथीने मैफिलीची रंगत वाढली, तर सुप्रसिद्ध निवेदक मंदार खराडे यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून आशा भोसलेंच्या स्वरप्रवासाचा वेध घेतला. सामाजिक बांधिलकीच्या या कार्यक्रमाला डॉक्टर, गायक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती. (Dombivli)

(हेही वाचा – Tukaram Mundhe : अकोल्यात तुकाराम मुंढेंच्या धाक; हजारो पेप्सी फेकल्या रस्त्यावर…वाचा सविस्तर प्रकरण)

या मैफिलीतून जमा झालेला संपूर्ण निधी अंधशाळा, अपंग, गरजू आणि दुर्धर आजाराने पिडीत रूग्णांना सेवाभावी वृत्तीने देण्यात येणार असल्याचे डॉ. मंदार अंजर्लेकर यांनी सांगितले. मध्यंतरात उपस्थित मान्यवरांचा कृतज्ञता म्हणून सत्कारही करण्यात आला. हाऊसफुल्ल झालेल्या या कार्यक्रमातून आरोही फाऊंडेशनचा संगीतासाठी समाज हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.