-
कल्याण, प्रतिनिधी
KDMC डोंबिवली जवळच्या खांबाळपाडा येथील केडीएमसीच्या कचरा डेपोमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धक्कादायक उघडकीस आली. घंटागाडीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (KDMC)
(हेही वाचा – Pune Municipal Corporation बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल)
माहिती मिळताच डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे. एसीपी सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. (KDMC)
(हेही वाचा – Earthquake : चीन आणि जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; किंघाई प्रांतात ४० मिनिटांत आले ८ भूकंप)
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने प्राथमिक ओळख पटविणे कठीण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. घंटागाडी कुठून आली? मृतदेह या गाडीत कधी आणि कसा टाकण्यात आला? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (KDMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

