Pune Municipal Corporation बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल

69
Pune Municipal Corporation बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल
Pune Municipal Corporation बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल

Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आणि महापौर कार्यालयाला बुधवारी एका ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार समोर येताच पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य इमारत तातडीने रिकामी करण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून पोलिसांच्या मदतीने संपूर्ण परिसरात युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे.

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनाने  तात्काळ पावले उचलली. सुरक्षेचा उपाय म्हणून मुख्य इमारतीमधील सर्व कर्मचारी आणि विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. अचानक इमारत रिकामी करण्याचे आदेश मिळाल्याने पालिका परिसरात काही काळ गोंधळ, भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा – मुसलमानांनी ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी स्वेच्छेने हिंदूंच्या स्वाधीन करावी; माजी एएसआय संचालक K K Muhammed यांचे आवाहन

पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आणि महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मुख्य इमारत रिकामी करण्यात आली असून, बॉम्ब शोधक पथकाद्वारे इमारतीची कसून तपासणी केली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ‘इकोनॉमिक्स टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ; प्रवेशावर बंदी
बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर महापालिकापरिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत आणि सुरक्षा यंत्रणांकडून परिसर सुरक्षित असल्याचा हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत इमारत कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी बंद राहणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुणे महानगरपालिका परिसरात बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून या धमकीच्या ईमेलचा कसून तपास सुरू आहे. हा ईमेल नेमका कुठून आणि कोणी पाठवला, याचा शोध सायबर सेलच्या मदतीने घेतला जात आहे. नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.