Drugs : ४ कोटींच्या अमली पदार्थांसह दोघांना अंधेरीत अटक

दिशा खान याचा संबंध असल्याचा संशय गुन्हे शाखेला असून दिशा खान याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

15
Drugs : ४ कोटींच्या अमली पदार्थांसह दोघांना अंधेरीत अटक, दोघांचा गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असल्याचा संशय
Drugs : ४ कोटींच्या अमली पदार्थांसह दोघांना अंधेरीत अटक, दोघांचा गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असल्याचा संशय

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने २ किलो ३३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थांसह दोन जणांना अंधेरी पश्चिम येथून अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४ कोटी ६ लाख ५० हजार रुपये किंमत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दोघांचे मुंबईतील अमली पदार्थ पुरवठादार दिशा खान उर्फ ​​दिशा बटाटा यांच्याशी थेट संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २०२१ मध्ये एनसीबीने अटक केलेल्या शादाब बटाटा यांच्याशी दिशा खान याचा संबंध असल्याचा संशय गुन्हे शाखेला असून दिशा खान याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

अंधेरी गिलबर्ट हिल येथील महानगर पालिकेच्या शाळेजवळ दोन इसम मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दया नायक यांच्या पथकाने मंगळवारी गिलबर्ट हिल या ठिकाणी सापळा रचून अर्शद शेख (२६) आणि इम्रान मेमन (२६) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली असता, दोघांजवळून एकूण २ किलो ३३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करून दोघांविरुद्ध डी. एन. नगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेले दोघेही पालघर जिल्ह्यातील रहिवासी असून त्या ठिकाणी दोघे शेळी पालनाचा व्यवसाय करतात.

(हेही वाचा – Attari border : अटारी बॉर्डरवर फडकणार देशातील सर्वात उंच तिरंगा; पाकिस्तानचा झेंडा होणार छोटा)

गुन्हे शाखेच्या चौकशीत हे दोघे कुख्यात अमली पदार्थ पुरवठादार दिशा खान उर्फ ​​दिशा बटाटा याच्या सांगण्यावरून अमली पदार्थांचा साठा देण्यासाठी अंधेरी येथे आले होते. दिशा खान हा मुंबईतील बड्या पार्ट्यामध्ये तसेच बॉलिवूड मध्ये अमली पदार्थ पुरविण्याचे काम करतो. त्याचा थेट संबंध गुन्हेगारी जगताशी सबंध असणारा फारूक बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याच्याशी असल्याचे समजते. शादाब बटाटा याला २०२१ मध्ये अमली पदार्थांच्या गुन्ह्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ने अटक केली होती. एका पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडा अमली पदार्थ कोकेन याला स्वस्त पर्याय म्हणून मेफेड्रोनला अमली पदार्थ सेवन करणार्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सद्या शहरात होणाऱ्या बड्या पार्ट्या, रेव्ह पार्टी तसेच बॉलिवूड मध्ये मेफेड्रोनला सर्वात मागणी असल्यामुळे शहरात मेफेड्रोनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.