Bademiya : कुलाब्यातील ७६ वर्षे जुने बडेमियाॅं हॉटेलच्या किचनमध्ये झुरळ आणि उंदराचा वावर; एफडीएने ठोकले टाळे

119

मुंबईच्या कुलाब्यात असलेले प्रसिद्ध ‘बडेमियाॅं ‘ (Bademiya) हॉटेलवर बुधवारी एफडीएच्या अधिकाऱ्यानी छापा टाकला. या छाप्या दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांना हॉटेलच्या किचनच्या तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. बडेमियाॅं हॉटेलच्या किचनमध्ये उंदीर आणि झुरळांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आल्याने तसेच हॉटेलला ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना’ नसल्यामुळे एफडीएने बडेमियाॅं हॉटेल व्यवस्थापनाला नोटीस देवून हॉटेलला टाळे ठोकले आहे.

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील मांसाहारासाठी ७६ वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेल्या ‘बडेमियाॅं’ (Bademiya) या हॉटेलच्या मुंबईत तीन शाखा आहे. या हॉटेलचे सेंट्रल किचन (मुख्य स्वयंपाक घर) हे कुलाब्यातील मुख्य शाखेत आहे. इतर शाखांना देखील खाद्य पदार्थ तयार करण्याचे काम कुलब्यातील सेंट्रल किचनमधून केले जात होते. मुंबईसह राज्यातील मांसाहार खवय्यासाठी कुलब्यातील बडेमियाॅं हे हॉटेल एक पर्वणीच होती. या हॉटेलचे ‘सीग कबाब’ हे प्रसिद्ध असून त्याची चव घेण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये येत असतात, मात्र एफडीएच्या कारवाईमुळे बडेमियाॅंचे पितळ उघडे पडले आहे.

(हेही वाचा Raj Thackeray : जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; राज ठाकरे म्हणाले, ‘मराठा समाजातील तरुण अस्वस्थ…’)

वांद्रे हिल रोडवरील प्रसिद्ध ‘पापा पंचो दा ढाबा’ या ठिकाणी एका ग्राहकाला काही आठवड्यापूर्वी जेवणात उंदीर आढळून आला होता, त्यानंतर एफडीएने या ढाब्यावर कारवाई  करून ढाबा सील करण्यात आला होता. या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाने  (एफडीए) मुंबईतील प्रसिद्ध आणि बड्या हॉटेलच्या किचनची तपासणी सुरू केली आहे. या कारवाईचा भाग म्हणून एफडीएचे बडेमियाॅं कुलाब्यातील बडेमियाॅं (Bademiya) हॉटेल वर छापा टाकून या हॉटेलचे सेंटर किचन आणि इतर दोन किचनची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान बुधवारी हॉटेलच्या मुख्य आणि इतर दोन लहान किचनमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर, घुसी, झुरळे आणि इतर कीटक वावरताना आढळून आले. एफडीएच्या अधिकारी यांनी किचनमधील काही नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले, तसेच हॉटेलचा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना’ देखील संपल्याचे आढळून आले. या प्रकरणी एफडीएने बडेमियाॅं व्यवस्थापनला हॉटेलला टाळे ठोकण्याची नोटीस बजावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.