Narayan Rane : सरसकट कुणबी दाखला 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही – नारायण राणेंचा दावा

89
Narayan Rane: जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो, नारायण राणेंनी माध्यमांशी साधला संवाद; म्हणाले...
Narayan Rane: जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो, नारायण राणेंनी माध्यमांशी साधला संवाद; म्हणाले...

सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी केला. मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत नारायण राणे यांनी आपली भूमिका मांडली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो त्यांनी मनोज जरांडे पाटील यांचे उपोषण समाप्त केले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे उपोषण केले त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. राज्य सरकारने महिन्याभराचा कालावधी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय पूर्वीही झाला होता. अनेकांनी आरक्षणाबाबत टीकाही केली, असे नारायण राणे म्हणाले.

सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळींची मागणी नाही

सरसकट दाखले करू नका. राज्य सरकारने घटनेतील 15/4 चा अभ्यास करावा. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. राज्यात 38 टक्के मराठा समाज आहे जो गरीब आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजातील वर्गाला आरक्षण द्यावे पण कुणाचेही आरक्षण काढून हे आरक्षण देऊ नये, असेही राणेंनी नमूद केले.

(हेही वाचा Manoj Jarange Patil : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

आरक्षण देताना द्वेषाची भावना नको

घटनेने तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. ज्याला इतिहासाची जाण आहे त्यानेच या विषयावर बोलावे. यापूर्वी जी आरक्षण देण्यात आली तेव्हा मराठेच मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये, अशी अपेक्षा नारायण राणेंनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंवर प्रहार

यावेळी नारायण राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवस देखील मंत्रालयात आले नाही आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत, असे राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.