Attari border : अटारी बॉर्डरवर फडकणार देशातील सर्वात उंच तिरंगा; पाकिस्तानचा झेंडा होणार छोटा

112

आता प्रत्येक भारतीय लवकरच पंजाबमधील अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर (Attari border) ‘झंडा उंचा रहे हमारा’ अभिमानाने गाणार आहे. भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या तिरंग्याच्या खांबाची उंची शेजारी देश पाकिस्तानपेक्षा 18 फुटांनी वाढवली आहे. सध्या भारतीय तिरंग्याच्या खांबाची उंची 360 फूट होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची 400 फूट ठेवण्यात आली आहे.

आता गोल्डन गेटसमोर भारताचा 418 फूट उंच ध्वजस्तंभ तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उद्घाटन काही दिवसांत होणार होते, मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र लवकरच या 418 फूट उंच ध्वज खांबावर भारतीय तिरंगा फडकताना दिसणार आहे.

3.5 कोटी रुपये खर्च

हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 3.5 कोटी रुपयांना बसवला आहे. 360 फूट उंचीच्या जुन्या ध्वज खांबापासून 100 मीटर अंतरावर गोल्डन गेटसमोर हा ध्वज खांब बसवण्यात आला आहे. जमिनीपासून 4 फूट उंचीचा पाया तयार करण्यात आला असून, त्यावर हा ध्वज खांब उभारण्यात आला आहे. जुना ध्वज खांब अमृतसर सुधार ट्रस्टने 2017 मध्ये बांधला होता. भारताने 2017 मध्ये 360 फूट उंच ध्वज खांब बसवल्यानंतर त्याच वर्षी पाकिस्तानने आपल्या सीमेवर 400 फूट उंच ध्वज खांब बसवला. पाकिस्तानकडून ध्वज फडकावण्यावरून दोन्ही देशांमध्ये बराच वाद झाला होता. पाकिस्तानी ध्वजाच्या खांबावर कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यावर पाकिस्तान भारतीय हद्दीत अनेक किलोमीटरपर्यंत नजर ठेवू शकतो. सध्या एनएचएआयने नवीन ध्वज खांबाच्या उद्घाटनासाठी सुमारे पाच राष्ट्रध्वज ठेवले आहेत. ज्याची लांबी आणि रुंदी 120×80 फूट आहे. प्रत्येक तिरंग्याचे वजन 90 किलो आहे.

(हेही वाचा WhatsApp Channels : व्हॉट्सॲप चॅनलचा १५० देशांमध्ये प्रसार करण्याचा मेटाचा मानस)

देशाचा सर्वात उंच ध्वज

आतापर्यंत देशाचा सर्वोच्च ध्वज बेळगाव, कर्नाटकात फडकत आहे. ज्यांची उंची 110 मीटर म्हणजेच 360.8 फूट आहे, जी अटारी सीमेवर आतापर्यंत फडकवलेल्या तिरंग्यापेक्षा फक्त 8 फूट जास्त आहे. मात्र नवीन ध्वज खांबाच्या उद्घाटनानंतर अटारी सीमेवर सर्वात उंच तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.