PM Modi On Sanatan Dharma : आज सनातन धर्मावर आघात करणारी I.N.D.I.A आघाडी उद्या देशावर आघात करेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

23
PM Modi On Sanatan Dharma : आज सनातन धर्मावर आघात करणारी I.N.D.I.A आघाडी उद्या देशावर आघात करेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
PM Modi On Sanatan Dharma : आज सनातन धर्मावर आघात करणारी I.N.D.I.A आघाडी उद्या देशावर आघात करेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

ज्या सनातन धर्माने स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महापुरुष आणि लोकमान्य टिळकांसारखे राष्ट्रपुरुष यांना प्रेरणा दिली, तो सनातन धर्म I.N.D.I.A आघाडीला संपवायचा आहे. (PM Modi On Sanatan Dharma) सनातन धर्माच्या प्रेरणेतूनच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून त्या राष्ट्रीय उत्सवाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी जोडून घेतले. ज्या सनातन धर्माला महात्मा गांधींनी आपल्या जीवनाचा आधार मानला, त्यांच्या मुखातले अखेरचे शब्द होते हे राम ! हा सनातन धर्म महर्षि वाल्मिकी, माता शबरी यांनी वाढवला फुलवला. तो सनातन धर्म I.N.D.I.A नावाच्या घमंडिया आघाडीला तोडायचा आहे. संपवायचा आहे. त्यामुळे या देशातील सर्व सनातनधर्मीय अनुयायांनी सावध राहावे. या देशावर आपल्या सर्वांचेच प्रेम आहे. पण आज त्यांचा सनातन धर्मावर हल्ला आहे. उद्या ते देशाचाही असाच घात करतील, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.मध्य प्रदेशातील बिना येथे रिफायनरीच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी I.N.D.I.A आघाडीवर घणाघती टीका केली. ‘I.N.D.I.A आघाडीची स्थापनाच मुळी सनातन धर्म नष्ट करण्यासाठी झाली आहे’, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

(हेही वाचा – Tech Layoffs : गूगलमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात)

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, कोरोना प्रमाणे नष्ट केले पाहिजे, असे विखारी उद्गार काढले होते. त्यानंतर संपूर्ण देशभर संताप उसळला. त्यानंतर स्वतः स्टालिन यांना त्यांनी हिंदू मंदिरांची कशी डागडूजी केली, त्यासाठी 650 कोटी रुपये खर्च केले, हे सांगावे लागले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे भाष्य केले आहे. (PM Modi On Sanatan Dharma)

I.N.D.I.A आघाडीच्या तीन मोठ्या बैठका पार पडल्यानंतर काल शरद पवारांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्या महारॅलीचे स्थान मध्यप्रदेशातील भोपाळ निश्चित करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ मध्ये आघाडीची पहिली महारॅली होईल. पण त्याआधीच मोदींनी मध्य प्रदेशात येऊन सनातन धर्माच्या मुद्द्यावर आघाडीचा समाचार घेतला आहे. (PM Modi On Sanatan Dharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.