
Mumbai Local : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एक ताजा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्य रेल्वेच्या लोकल डब्यामध्ये एका पुरुष प्रवाशाने सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाला आधी हाताने आणि मग बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या घटनेमुळे जनमानसात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (7 ऑगस्ट) सकाळी मध्य रेल्वेच्या जनरल डब्यात घडली. लोकलमध्ये सीटवर झोपल्याच्या कारणावरून महिला आणि संबंधित पुरुष प्रवाशामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या पुरुषाने आधी तिला कानाखाली वाजवली आणि त्यानंतर कमरेचा बेल्ट काढून महिलेवर हल्ला केला.
A woman was allegedly assaulted by a male passenger inside a Mumbai local train near Wadala railway station, in a disturbing incident that has drawn widespread attention.
According to preliminary information, the woman was asleep on a seat inside the compartment when the accused… pic.twitter.com/BihoKaT1UF
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) August 7, 2026
(व्हिडिओ सौजन्य: HATE DETECTOR)
या संपूर्ण प्रकारादरम्यान डब्यातील इतर प्रवासी उपस्थित होते. मात्र, सुरुवातीला कोणीही मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले नसल्याचेही व्हिडिओत दिसून येते. त्यामुळे या घटनेनंतर प्रवाशांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा: UPI Transactions Free : युपीआय व्यवहारांवर आता खरंच शुल्क भरावं लागणार का?
याद्वारे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तो माणूस नेमका कोण आहे याचा पोलीस वेगाने शोध घेत आहे. आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community
