Agni-4 Missile : भारताची नवी संरक्षण झेप! ‘अग्नी-4’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; जाणून घ्या वैशिष्ट्ये

अग्नी-4' (Agni-4 Missile) हे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे

130
Agni-4 Missile
भारताने अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

Agni-4 Missile : भारताने आपल्या संरक्षण क्षमतेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गुरुवारी (6 ऑगस्ट) ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) वरून ‘अग्नी-4’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Medium Range Ballistic Missile – MRBM) यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (Strategic Forces Command – SFC) यांच्या देखरेखीखाली पार पडली. संरक्षण मंत्रालयाने चाचणी यशस्वी झाल्याची अधिकृत माहिती दिली असून, क्षेपणास्त्राचे सर्व तांत्रिक आणि कार्यक्षमतेशी संबंधित निकष अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

‘अग्नी-4’ची ही नियमित यूजर ट्रायल होती. यामध्ये प्रत्यक्ष कार्यरत परिस्थितीत क्षेपणास्त्राची अचूकता, मार्गक्रमण, नियंत्रण प्रणाली आणि लक्ष्य भेदण्याची क्षमता तपासण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, चाचणीदरम्यान निश्चित करण्यात आलेले सर्व उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलाच्या सामरिक क्षमतेला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे. (Agni-4 Missile)

हेही वाचा: Iran-Oman मध्ये ६० दिवसांच्या करारावर सहमती, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?

‘अग्नी-4’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये:

‘अग्नी-4’ (Agni-4 Missile) हे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत: 

  • मारक क्षमता : सुमारे 4,000 किलोमीटर
  • इंधन : दोन टप्प्यांचे घन इंधन (Solid Fuel)
  • वाहून नेण्याची क्षमता : पारंपरिक तसेच अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम
  • अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली : लक्ष्यावर उच्च अचूकतेने प्रहार करण्यासाठी आधुनिक मार्गदर्शन तंत्रज्ञान
  • मोबाइल लाँचर : विविध ठिकाणांहून तैनात आणि प्रक्षेपित करता येते. (Agni-4 Missile)

भारतासाठी ही चाचणी का महत्त्वाची?

‘अग्नी’ मालिकेतील क्षेपणास्त्रे भारताच्या सामरिक संरक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. ‘अग्नी-4’च्या यशस्वी चाचणीमुळे लांब पल्ल्यावरील लक्ष्यांवर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता पुन्हा सिद्ध झाली आहे. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत विश्वासार्ह प्रतिरोधक क्षमता (Credible Deterrence) कायम ठेवण्यासाठी अशा चाचण्या महत्त्वाच्या मानल्या जातात.

हेही वाचा: Bhandara Crime : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमांकडून अत्याचार; निषेधार्थ स्थानिकांकडून शहरात कडकडीत बंद!

स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळ

गेल्या काही वर्षांत भारताने संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानावर मोठा भर दिला आहे. क्षेपणास्त्र, लढाऊ विमान, ड्रोन आणि अत्याधुनिक संरक्षण प्रणालींच्या विकासात सातत्याने प्रगती होत आहे. ‘अग्नी-4’ची यशस्वी चाचणी ही त्याच प्रयत्नांचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भारताने टाकलेले हे आणखी एक पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Agni-4 Missile)

हेही पाहा:

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.