
Tuljabhavani Temple: श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी, पलंगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी सुरू आहे. दररोज हजारोंच्या संख्येने पलंगाच्या दर्शनासाठी शहर व पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. पलंगोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
शनिवार ता. १९ रोजी सायंकाळी शहरातून उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पलंगाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शहरातील तिळवण तेली समाज कार्यालयामध्ये रविवार ता. २० रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगावर पासोडा पूजन होवून परंपरेनुसार धार्मिक विधी करून गादीची स्थापना करण्यात आली.

