Paper leak case: बीड आणि बिहारमधून २ आरोपी गजाआड, १८ मुख्य सूत्रधारांवर कारवाई

7
Paper leak case: बीड आणि बिहारमधून २ आरोपी गजाआड, १८ मुख्य सूत्रधारांवर कारवाई
Paper leak case: बीड आणि बिहारमधून २ आरोपी गजाआड, १८ मुख्य सूत्रधारांवर कारवाई

Paper leak case: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटीच्या बहुचर्चित प्रकरणात भिवंडी पोलिसांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. या घोटाळ्यातील दीर्घकाळापासून फरार असलेल्या २ मुख्य संशयितांना पोलिसांनी बीड आणि बिहार येथून मुसक्या आवळल्या आहेत.

प्रकाश मिसाळ आणि अशोक साव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, या कारवाईमुळे या गुन्ह्याशी संबंधित सर्व १८ मुख्य सूत्रधार आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

हेही वाचा – Sonia Gandhi यांना मोठा धक्का! मतदार यादी प्रकरणी कोर्टाने फिरवला मॅजिस्ट्रेटचा निकाल; काय आहे नेमकं प्रकरण?

४ राज्यांमध्ये पसरले होते जाळे

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा केवळ स्थानिक गैरप्रकार नसून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ४ राज्यांत पसरलेला एक आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने तंत्रज्ञानाचा वापर करत माग काढला आणि फरार दोघांनाही बेड्या ठोकल्या.

ही संपूर्ण घटना २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या अवघ्या १ दिवस आधी उघडकीस आली होती. भिवंडीतील एका व्यक्तीला प्रश्नपत्रिका विकण्याचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोणगाव परिसरात ‘डमी ग्राहक’ बनवून सापळा रचला आणि संशयितांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून जप्त केलेले ४ प्रश्नपत्रिका संच ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या अधिकाऱ्यांकडून तपासून घेतले असता, ते मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले.

बुटाच्या इनसोलमध्ये लपवून चोरली प्रश्नपत्रिका

या प्रकरणी न्यायालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात (चार्जशीट) अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याचे कनेक्शन उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका प्रिंटिंग प्रेसशी जोडलेले होते. प्रेसमधील २ कर्मचाऱ्यांनी अवघ्या ८,००० रुपयांच्या आमिषापोटी प्रश्नपत्रिका चोरली होती. ही प्रश्नपत्रिका अत्यंत हुशारीने त्यांनी आपल्या बुटांच्या इनसोल्स आणि सॉक्समध्ये लपवून कारखान्यातून बाहेर काढली होती.

मुख्य सूत्रधारासह सर्व १८ आरोपींवर कारवाई

भिवंडी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह सर्व १८ आरोपींची नावे समाविष्ट आहेत. बिजेंद्र गुप्ता याच्यावर यापूर्वी ओडिशामध्ये झालेल्या एका पेपरफुटी प्रकरणातही गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे नोंदवून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.