गावागावात भगवा फडकवण्यासाठी Shiv Sena चा मास्टरप्लॅन; पदाधिकाऱ्यांसाठी थेट ‘हे’ काय आणलं?

12
गावागावात भगवा फडकवण्यासाठी Shiv Sena चा मास्टरप्लॅन; पदाधिकाऱ्यांसाठी थेट ‘हे’ काय आणलं?
  • प्रतिनिधी

Shiv Sena            स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विविध रणनीती आखल्या जात आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं असून, गावपातळीवर पक्षाची पाळंमुळं अधिक घट्ट करण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत थेट पोहोचून त्यांची मनं जिंकणे आणि पक्ष वाढवणे हे प्रत्येक पक्षापुढील मोठे आव्हान ठरत आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा – Umpire Pay Hike : बीसीसीआयची पंचांसाठी मोठी भेट; मानधनात वाढ)

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी एक अनोखा आणि आक्रमक मार्ग निवडला आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची पाळंमुळं आणखी रुजवण्यासाठी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना गतिमान करण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विशेषतः ग्रामीण पट्ट्यात पक्षाचा झंझावाती प्रचार व्हावा आणि ‘शिवसेना आपल्या दारी’ हे अभियान घरोघरी पोहोचावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. (Shiv Sena)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या एका इशाऱ्याने आरोग्य क्षेत्रात काय घडामोडी घडल्या? वैद्यकीय शिक्षणात मोठी क्रांती)

या मोहिमेचा भाग म्हणून पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांना पक्षकार्यासाठी थेट नव्याकोऱ्या गाड्या (कार) दिल्या जाणार आहेत! आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने १३ नव्याकोऱ्या मोटारींची खरेदी करण्यात आली असून, या गाड्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून तालुकाप्रमुख ग्रामीण भागात दौरे करतील; मात्र या गाड्या केवळ पक्षकार्यासाठीच वापरल्या जाव्यात यासाठी त्यांच्या वापराचा दैनंदिन अहवालही घेतला जाणार आहे. लवकरच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या गाड्यांचे लोकार्पण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.