Umpire Pay Hike : बीसीसीआयची पंचांसाठी मोठी भेट; मानधनात वाढ

Umpire Pay Hike : मूल्यमापनासाठीही नवीन पद्धत आणली आहे. 

15
Umpire Pay Hike : बीसीसीआयची पंचांसाठी मोठी भेट; मानधनात वाढ
  • ऋजुता लुकतुके

Umpire Pay Hike              भारतीय क्रिकेटमधील पंच आणि सामनाधिकारी यांच्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये काम करणाऱ्या पंचांच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन करण्यासाठी नवी श्रेणीव्यवस्था लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ अनुभवाच्या आधारावर नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारे पंचांना सामन्यांची जबाबदारी मिळणार आहे. (Umpire Pay Hike)

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचांच्या मानधनात जवळपास दशकभरानंतर बदल करण्यात आला आहे. यापूर्वी पंचांच्या चार श्रेणी होत्या. आता त्यांची पुनर्रचना करून अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणी करण्यात आल्या आहेत. नव्या व्यवस्थेनुसार अनुक्रमे ६० हजार, ५० हजार, ४० हजार आणि ३५ हजार रुपये प्रतिदिन मानधन मिळणार आहे. सामनाधिकाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. (Umpire Pay Hike)

(हेही वाचा – Zim vs Aus 2nd ODI : ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर ८४ धावांनी मात)

या निर्णयातील महत्त्वाचा भाग म्हणजे पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन. पंच मंडळाअंतर्गत स्वतंत्र मूल्यमापन पथक पंचांच्या निर्णयक्षमता आणि एकूण कामगिरीचा आढावा घेणार आहे. त्यानुसार त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यांची जबाबदारी दिली जाईल. प्रत्येक हंगामाच्या अखेरीस या मूल्यमापनाच्या आधारे पंचांना पुढील श्रेणीत बढती मिळू शकते किंवा कामगिरी समाधानकारक नसल्यास त्यांची श्रेणी खाली केली जाऊ शकते. (Umpire Pay Hike)

बीसीसीआयच्या मते, या व्यवस्थेमुळे संपूर्ण हंगामात पंच अधिक दक्ष आणि सजग राहतील. पंचांचा एक चुकीचा निर्णय एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे पंचांची गुणवत्ता आणि निर्णयक्षमता हा देशांतर्गत क्रिकेटच्या दर्जाचा महत्त्वाचा भाग आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंच आणि सामनाधिकाऱ्यांसाठी सुधारित मानधनरचना तसेच नव्या श्रेणीव्यवस्थेला मंजुरी देण्यात आली. (Umpire Pay Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.