KDMC च्या शाश्वत शून्य कचरा मोहिमेस डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिन्याच्या पहिल्याच रविवारी ५ टन सुका कचरा संकलित

189
KDMC च्या शाश्वत शून्य कचरा मोहिमेस डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
KDMC च्या शाश्वत शून्य कचरा मोहिमेस डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) महापौर ॲड. हर्षाली चौधरी (Harshali Chaudhari) आणि आयुक्त अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांच्या निर्देशांनुसार, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे (Ramdas Kokare) यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत शून्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार हा सुका कचरा संकलन दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.

1004605397 scaled e1785667231467

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी त्यांना अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या मुलीला माफ केल्यानंतर मुलीच्या आईची भावुक प्रतिक्रिया; म्हणाली…)

या मोहिमेसाठी महानगरपालिका क्षेत्रातील २५ ठिकाणी सुक्या कचऱ्यातील पुनर्वापरायोग्य घटक स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी विशेष कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. महापालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सकाळी डोंबिवलीतील रोटरी भवन येथील संकलन केंद्रावर रोटरी क्लबच्या वतीने २५२ किलोग्रॅम ई-वेस्ट संकलित करण्यात आला. याशिवाय ऊर्जा फाऊंडेशन, टिळकनगर गणेशोत्सव मंडळ, निर्मल फाऊंडेशन आणि रिजन्सी वुमन्स क्लब या संस्थांनी देखील विविध केंद्रांवर सुका कचरा संकलनासाठी समन्वय साधला. या मोहिमेत प्लास्टिक, कपडे, कागद, काच, थर्माकोल, फर्निचर यांसारखे सुमारे ५ टन सुका कचरा संकलित करण्यात आला.

आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सुका कचरा वेगळा केल्याने त्याच्या पुनर्वापराला चालना मिळते आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता महापालिकेच्या घंटागाडीतच द्यावा. तसेच महापालिकेच्या दर महिन्याच्या पहिल्या रविवारी राबविण्यात येणाऱ्या सुका कचरा संकलन मोहिमेस नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.