पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी (Morwadi) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आर्थिक संकटाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा टोकाचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत पन्नास वर्षांचे कुटुंबप्रमुख विनोद पिल्लई (Vinod Pillai) यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या ४५ वर्षांच्या पत्नी आणि १९ वर्षांच्या मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दोन्ही महिलांवर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pimpri Suicide Incident)
(हेही वाचा – मंचरमध्ये शांताबाई शेळके यांचं स्मारक उभारणार, Dilip Walse Patil यांची घोषणा)
बंद खोलीत कोळशाचा धूर आणि विषप्राशन
मूळचे केरळ येथील रहिवासी असलेले हे कुटुंब मोरवाडीतील एका भाड्याच्या घरात राहत होते. प्राथमिक तपासानुसार, घरातील सर्व खिडक्या-दारे बंद करून त्यांनी कोळसा जाळून धूर निर्माण केला आणि त्यानंतर विषारी औषध प्राशन केले. कामावर न पोहोचल्यामुळे सहकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही रुग्णालयात दाखल केले, परंतु तपासणीदरम्यान डॉक्टरांनी कुटुंबप्रमुखाला मृत घोषित केले.
(हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत लोकशाहीर Annabhau Sathe Jayanti उत्साहात साजरी; शोषितांच्या आवाजाला केडीएमसीचा सलाम )
घटनास्थळी सापडली हस्तलिखित चिठ्ठी
संत तुकाराम नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची झाडाझडती घेताना एक हस्तलिखित चिठ्ठी (Suicide Note) सापडली आहे. त्यामध्ये सातत्याने जाणवणाऱ्या आर्थिक अडचणींमुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

