Virat Kohli ICC Ranking : विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या दहांत 

द आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत विराटने दोन्ही डावांत ३८ आणि ७८ धावा केल्या होत्या

164
Virat Kohli ICC Ranking : विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या दहांत 
Virat Kohli ICC Ranking : विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या दहांत 

ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli ICC Ranking) चार क्रमांक वर सरकला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहांत आला आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने अनुक्रमे ३८ आणि ७८ धावा केल्या. याचा परिणाम क्रमवारीवर झाला असून तो आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

(हेही वाचा-Ind vs SA 2nd Test : केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी २३ बळी, दिवस अखेर भारताचं पारडं थोडं जड )

कोहलीने क्रमवारीत आगेकूच केली असली तरी पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि कोहली यांच्या रेटिंग गुणांमध्ये अजूनही १०३ गुणांचा फरक आहे. जो रुट दुसऱ्या तर स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारतीय कर्णधार रोहीत शर्मा सेंच्युरियन कसोटीत ५ आणि शून्य धावा करून बाद झाला होता. त्यामुळे त्याची क्रमवारीत घसरण होऊन तो चौदाव्या स्थानावर फेकला गेला आहे. तर सेंच्युरियनमध्ये पहिल्या डावात शतक करणारा के एल राहुल आता ५१ व्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे तीन खेळाडू पहिल्या दहांत आहेत. आर अश्विन पहिल्या स्थानावर कायम आहे. तर रवी जाडेजा चौथ्या आणि बुमरा पाचव्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवी जाडेजा अव्वल आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.