Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अटक करा; विश्व हिंदू परिषदेने केली मागणी

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे.याचसंदर्भात आव्हाड यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

213
Baramati Rojgar Mela: रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल, जितेंद्र आव्हाड यांनी
Baramati Rojgar Mela: रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल, जितेंद्र आव्हाड यांनी "X" पोस्टद्वारे सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्यावर साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी येथे सुरु असलेल्या शिबिरात प्रभू श्रीरामबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे पाहावयास मिळत आहे.याचसंदर्भात आव्हाड यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने(Vishwa Hindu Parishad) केली आहे. (Jitendra Awhad )

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामबद्दल वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. (Jitendra Awhad)

(हेही वाचा : Jitendra Awhad : ‘त्या’ विधानानंतर राम कदम आणि अखिल भारतीय संत समाजाकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध)

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरात आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुरेंद्र महाले यांचा शिर्डी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.तर त्यांना लवकरात लवकर अटक करावी असा अर्ज सुरेंद्र महाले यांनी दिला आहे. नाशिकचे साधू, महंत यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आव्हाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.