Jitendra Awhad : ‘त्या’ विधानानंतर राम कदम आणि अखिल भारतीय संत समाजाकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध

एकीकडे राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे मात्र विरोधकांकडून यावर टीका होतांना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी एक आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या त्या विधानावरून आता संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

220
Jitendra Awhad : 'त्या' विधानानंतर राम कदम आणि अखिल भारतीय संत समाजाकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध

विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीतील पक्षाच्या अभ्यास शिबिरात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीला संबोधित करताना ‘भगवान राम बहुजनांचे राजा आणि मांसाहारी होते’ असे म्हणत वादाला सुरुवात केली.

‘आम्ही इतिहास वाचत नाही आणि राजकारणात सर्व काही विसरत नाही. राम आमचे आहेत. (Jitendra Awhad) आमच्यातले बहुजन. जे खाण्यासाठी शिकार करायचे… राम कधीही शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी होते. १४ वर्षे जंगलात राहिलेला माणूस शाकाहारी कसा राहू शकतो “, असा सवाल त्यांनी केला.

(हेही वाचा – Ram Temple Threat : बॉम्बस्फोट धमकी प्रकरणी एसटीएफकडून दोघांना अटक)

याच पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. रामभक्तांच्या कोट्यवधी भक्तांच्या भावनांचा अनादर करणाऱ्या (Jitendra Awhad) आव्हाड यांना भाजपने लक्ष्य केले.

राम कदम यांचा आव्हाडांना सवाल –

‘भगवान रामाने मांसाहारी पदार्थ खाल्ले याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काय पुरावा आहे? तो ते पाहण्यासाठी गेला होता का? जेव्हा मंदिराचे उद्घाटन होत आहे, तेव्हा त्यांनी प्रभू रामाच्या कोट्यवधी भक्तांच्या भावनांचा अनादर केला आहे “, असे राम कदम म्हणाले.

दरम्यान अखिल भारतीय संत समिती धर्म समाजातर्फे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला आहे. भगवान रामाबद्दल आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी अ.भा. संत समाजातर्फे अनिकेत शास्त्रींनी आव्हाडांबद्दल (Jitendra Awhad) नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – SSC HSC Exam 2024 : राज्यभरातील शिक्षण संस्थाचालकांचा दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार ?)

आव्हाड यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी –

अखिल भारतीय संत समिती धर्म समाज्याचे महंत अनिकेत शास्त्री यांनी सांगितले की, “अखिल भारतीय संत समिती धर्म समाज जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत आहे राज्य सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी. अशी मागणी करून ते म्हणाले की आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिकला यावे आणि श्री प्रभू रामचंद्र यांचे जीवन त्यांचे कार्य यावर समोरासमोर चर्चा करावी असे खुले आव्हान देखील त्यांनी दिले आहे.”

माझी विधाने वास्तववादी – जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले की ते काहीही वादग्रस्त बोलले नाहीत. “माझी विधाने वास्तववादी होती. रामाला शाकाहारी बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. या देशातील 80% पेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत आणि ते भगवान रामाचे भक्त आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.